Type Here to Get Search Results !

शिवणे मध्ये एकावर जीवघेणा हल्ला; वारजे पोलीस घटनास्थळी दाखल




पुणे,दि.१६ मार्च २०२२ (चेकमेट टाईम्स): आज बुधवार दि. १६ मार्च २०२२ रात्री साडे नऊच्या सुमारास शिवणे मधील दांगट पाटील नगर मध्ये एका तरुणावर चार ते पाच जणांच्या टोळक्याने खुनी हल्ला केल्याची घटना घडली आहे.

घटनेबाबत माहिती मिळताच वारजे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, जखमी तरुणाला उपचारार्थ रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

हल्ल्यातील जखमी तरुणाचे नाव आणि हल्लेखोरांबाबत माहिती घेण्याचे काम वारजे पोलीस करत आहेत. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेतील जखमी तरुण हा दांगट पाटील नगर मधील स्नेहा विहार जवळ असलेल्या एका दुकानासमोर उभा असताना, रिक्षामधून आलेल्या अज्ञात तरुणांनी त्याच्यावर बांबू, गज आणि इतर तत्सम हत्यारांनी खुनी हल्ला केला. घटना घडल्यानंतर नागरिकांची एकच पळापळ झाली.

याबाबत माहिती मिळताच, वारजे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, जखमीला उपचारार्थ रुग्णालयात हलवले असून, हल्लेखोरांबाबत माहिती घेण्याचे काम चालू असून, वारजे पोलीस तपास करत आहेत.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.