Headlines
Loading...
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या या खासदाराला कोरोनाची लागण; काळजी घेण्याचे आवाहन

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या या खासदाराला कोरोनाची लागण; काळजी घेण्याचे आवाहन

 

NCP MP Vandana Chavan was infected with corona; Appeal to care

पुणे, दि.17 एप्रिल २०२२ (चेकमेट टाईम्स): राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. त्या सध्या दिल्ली मध्ये असून, त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती समोर येते आहे.

 शनिवार दि.१६ एप्रिल २०२२ रोजी पुण्यातील कर्वेनगर मध्ये आयोजित “राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा” संवाद कार्यकर्त्यांशी, पक्षाच्या केंद्रबिंदूंशी, या संवाद यात्रेच्या पाचव्या टप्प्यातील आढावा बैठक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, पुणे शहर युवक अध्यक्ष किशोर कांबळे यांच्यासह राष्ट्रवादीचे आमदार, नगरसेवक, पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली.

 

पुणे शहरात ही यात्रा आली होती आणि पुण्यातील राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार वंदना चव्हाण यांची मात्र या कार्यक्रमाला अनुपस्थिती होती.त्याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, खासदार वंदना चव्हाण यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. या वृत्ताला दस्तुरखुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुजोरा दिला असून, कोरोना अजून संपलेला नाही. महाराष्ट्रात देखील अजून काही प्रमाणात दररोज रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे अति उत्साहात गाफील राहू नका असे आवाहन पवार यांनी यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केले आहे.आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84


0 Comments: