Type Here to Get Search Results !

पालखी सोहळ्यासाठी उद्यापासून २ दिवस दिवे घाट बंद

 





दि.२३ जून २०२२ (चेकमेट टाईम्स):  पुरंदर तालुक्यात श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवड येथे शुक्रवारी (दि. 24) मुक्कामी येत आहे. पालखी सोहळ्याचा शुक्रवार (दि. 24) आणि शनिवारी (दि. 25) दोन दिवस सासवडला मुक्काम आहे. तर, रविवारी (दि. 26) सोहळ्याचा मुक्काम जेजुरी, सोमवारी (दि. 27) वाल्हा आणि मंगळवारी (दि. 28) श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करीत आहे. दरम्यान, शुक्रवारी आणि शनिवारी दिवे घाट पालखी सोहळ्याव्यतिरिक्त अन्य लोकांसाठी बंद राहील, असे सासवडचे पोलिस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी सांगितले. सासवडमधील लोकांना काही आकस्मिक काम निघाले किंवा पुण्याला जायचे असेल, तर त्यांनी सासवड, गराडे, मरीआई घाट, खेड शिवापूर, पुणे या मार्गाचा वापर करायचा आहे. कापूरहोळ, चिव्हेवाडी घाट, नारायणपूरकडून सासवडकडे येणारी वाहतूक पूर्ण बंद राहणार आहे आणि ती वाहतूक सातारा महामार्गाकडून घेण्यात आलेली आहे. जेजुरीकडून सासवडकडे पुण्याला जाणारी वाहतूक पूर्ण बंद राहणार आहे. जेजुरी, मोरगाव, सुपा, सोलापूर महामार्गाचा वापर नागरिकांनी करायचा असल्याचे घोलप यांनी सांगितले.

वाहतुकीमध्ये खूप बदल करण्यात आलेला आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडला मुक्कामासाठी शुक्रवारी येणार आहे. त्या वेळी सासवडकडे येणारे दिवे घाटमार्गे व सासवडकडे बापदेव घाट या मार्गावरची सासवडकडे येणारी पूर्ण वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्या लोकांनी पर्यायी सोलापूर आणि सातारा महामार्गाचा वापर करावयाचा आहे. पोलिस यंत्रणेकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यासाठी 4 उपविभागीय पोलिस अधिकारी, 17 पोलिस निरीक्षक, पुरुष पोलिस जवान 436, महिला पोलिस 110, 450 होमगार्ड, 50 वाहने, अशी यंत्रणा असून, दोन पाळ्यात पोलिस बंदोबस्त काम पाहणार आहेत. ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख व बारामतीचे अप्पर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते हे या सोहळ्याचे नेतृत्व करणार आहेत, अशी माहिती सासवड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी सांगितले.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.