Type Here to Get Search Results !

आमचा प्रवास सध्या मुंबई ते आसाम; खासदार सुप्रिया सुळे.

 


दि.२३ जून २०२२ (चेकमेट टाईम्स):  राज्याच्या राजकीय हालचालीचे केंद्र आता मुंबईकडून आसामकडे सरकले आहे. आणि आम्‍हीही त्याच प्रवासात अडकल्याची खंत खुद्द खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.निमित्त होते, यशस्विनी महिला सन्मान सोहळ्याचे. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात सकाळपासून राज्यभरातील यशस्विनी महिलांची लगबग सुरू होती. समाजातील सहा क्षेत्रांमध्ये यशस्वी कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ.आ.ह.साळुंखे यांच्या उपस्थितीत होणार होते. निमंत्रितांमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांचेही नाव होते. 

मात्र, मंगळवारपासून राज्यात चाललेल्या सत्ता नाट्यातील आपत्कालीन स्थितीमुळे, कोणी येणार का नाही याबद्दल सर्वच अनभिज्ञ होते. निदान साहेब नाही तरी ताई येतील, या अपेक्षेने सर्वच जोरदार तयारी करत होते. पण राज्यातील राजकीय घडामोडींचा वेग आणि राष्ट्रवादीची भूमिका पाहता दोन्ही खासदार उपस्थित राहणे शक्य नव्हते. मात्र, पुरस्कार सोहळ्यात प्रास्ताविकासाठी खासदार सुळे ऑनलाइन उपस्थिती दर्शवली. अगदी काही मिनिटांसाठी झूमवर आलेल्या खासदार सुळे यांनी सुरवातच अनुपस्थितीबद्दल दिलगिरी व्यक्त करत केली. त्या म्हणाल्या, ‘‘तुम्ही सर्वांनी या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी खूप मेहनत घेतली आहे. राज्यातील राजकीय घडामोडींमुळे पवार साहेब उपस्थित राहू शकले नाही. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते. तुम्हाला माहीत आहे. आमचा प्रवास सध्या मुंबई ते आसाम असा चालू आहे.’’

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.