Headlines
Loading...
जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकून २३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकून २३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

 


दि.२१ जून २०२२ (चेकमेट टाईम्स): पुणे शहरातील काही पोलिस ठाण्याच्या हद्दीत जुगार अड्डे ,सह अवैध धंदे खुलेआमपणे पाहण्यास मिळत आहे तसेच लॉटरीच्या नावाखाली सोरट, मटका, व तिकडम, विडिओ गेम, वर जुगार घेण्यात येत आहे तर गुरुवार पेठेतील फुलवाला चौकाजवळील गौरी आळीत जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने छापा घातला. त्यात जुगार खेळणारे ८, खेळविणारे ६ आरोपी ४ आणि पळून गेलेले ५ अशा २३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यांच्याकडून ४ मोटारसायकलींसह एकूण २ लाख ७५ हजार ४२० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. जुगार अड्डा मालक अमोल बाळासाहेब आंदेकर (वय ४५, रा.गुरुवार पेठ), जुगार अड्डा मालक मनोज ढावरे (रा.तळजाई माता वसाहत, पद्मावती), शकील शेख (रा. मोमीनपूरा), रवींद्र रामभाऊ पवार (वय ५५, रा.रविवार पेठ) यांच्यावर ही गुन्हा दाखल करण्यात आला आहेत.

तीन परिविक्षाधिन पोलीस उपनिरीक्षकांसह पोलीस पथकाने सोमवारी रात्री साडेआठ वाजता येथे छापा घातला. त्यावेळी ५ जण पळून गेले. तेथे असणाऱ्या १४ जणांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ८ हजार ९२० रुपये रोख, ६० हजार ५०० रुपयांचे १३ मोबाईल, जुगाराचे साहित्य, ४ मोटारसायकल असा २ लाख ७५ हजार ४२० रुपयांचा माल जप्त केला.पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक, पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया पंधरकर पोलीस हवालदार मोहिते, शिंदे, इरफान पठाण, कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84 

0 Comments: