Type Here to Get Search Results !

वारकऱ्यांनी टाळ-मृदुंगाच्या गजरात विठूनामाचा जयघोष करत केली पुणे मेट्रोची सफर

 


दि.२४ जून २०२२ (चेकमेट टाईम्स ): विनायक नवयुग मित्र मंडळ ट्रस्ट आणि सारथी कट्टा यांच्यावतीने आज १०० वारकऱ्यांना मेट्रोची सफर घडविण्यात आली मित्रवर्य सुनील पांडे यांच्या निमंत्रणावरून ह्या अगळ्यावेगळ्या उपक्रमाचा आनंद लाभला.गरवारे मेट्रो स्टेशन ते वनाजपर्यंत आणि पुन्हा गरवारे स्थानकापर्यंत वारकरी टाळ आणि मृदुंगाच्या गजरात विठूनामाचा जयघोष करत होते.काहींनी फुगड्या घातल्या तर काहींनी भक्तीरसात चिंब भिजत भजनावर ठेका धरला.तर काहींनी तल्लीन होऊन नृत्य केले.

वारकऱ्यांना सालाबादप्रमाणे भोजन प्रसादाची व्यवस्था तर मंडळाने केलीच होती मात्र त्यांना मेट्रोची सफर घडवायचे ठरविले असे सुनील पांडे यांनी सांगितले. तर वारकऱ्यांच्या मेट्रो सफरीने आमचे स्थानक पावन झाल्याची भावना मेट्रोचे अतुल गाडगीळ व हेमंत सोनावणे यांनी व्यक्त केली.यावेळी संदीप खर्डेकर यांच्या हस्ते अतुल गाडगीळ यांचा तर सुनील पांडे व दत्तात्रय फंड यांच्या हस्ते हेमंत सोनावणे आणि दिंडी प्रमुख पंढरीनाथ महाराज यांचा स्मृतिचिन्ह व उपरणे देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे पुणे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर,अखिल कर्वे रोड गणेशोत्सव मंडळाचे चित्रसेन खिलारे, सारथी ग्रुपचे पराग ओझा, राजेश राठोड, निलेश लाटे, भारतीय जनता पार्टी पुणे शहर उपाध्यक्ष सुनील पांडे, पुणे मेट्रोचे अतुल गाडगीळ, हेमंत सोनवणे, राजेश जैन, विनायक नवयुग मित्र  मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष दत्तात्रय फंड, सरचिटणीस वरूण जकातदार, उपाध्यक्ष समीर हळंदे, अभिजीत मोडक, खजिनदार गुणेश साने, रमेश गिरमकर उपस्थित होते.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.