Type Here to Get Search Results !

थकित बील मागितल्याच्या रागातून एका तरुणावर वार; सिंहगड रोड

 


दि. 0 जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): डेकोरेशनच्या कामाचे थकित बील मागितल्याच्या रागातून टोळक्याने एका तरूणावर वार करून त्याला गंभीररित्या जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना 3 जुलैला रात्री साडेअकराच्या सुमारास पुण्याच्या धायरीतील बेनकरवस्तीवर घडली. सौरभ शिंदे असे या जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अजिंक्य कांबळे यांनी सिंहगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. फिर्यादी अजिंक्य आणि सौरभ मित्र असून ते भागीदारीत डेकोरेशनचे काम करतात. काही महिन्यांपुर्वी त्यांनी आरोपीच्या समारंभात डेकोरेशनचे काम केले होते. मात्र, त्यांचे थकित बील येणे बाकी होते. त्यामुळे अजिंक्य आणि सौरभ आरोपीला फोन करून बिलाची मागणी करीत होते. त्याचा राग आल्यामुळे आरोपीने इतर साथीदारांना बोलावून सौरभच्या डोक्यात दगड मारून पाठीवर वार केला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक भरत चंदनशिवे तपास करीत आहेत.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.