Type Here to Get Search Results !

पुण्यात वाढदिवस साजरा करणाऱ्या टोळक्याची दहशत

 


दि. 0 जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): शहरात भररस्त्यात वाढदिवस साजरा करुन दहशत माजविण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. एनडीए रस्त्यावरील उत्तमनगर परिसरात वाढदिवस साजरा करताना दहशत माजवणाऱ्या टोळक्याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

या प्रकरणी संकेत मालखेडकर, सुजल डाखोळे, ओंकार काशीदर, साहिल इंगोले यांच्यासह २५ ते ३० जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कर्मचारी विशाल वारुळे यांनी या संदर्भात उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. एनडीए रस्त्यावरील उत्तमनगर परिसरात कोहिनूर हॉटेलशेजारी मोकळ्या जागेत मध्यरात्री एकच्या सुमारास मालखेडकर, डाखोळे, काशीद, इंगोले आणि साथीदार जमले. त्यांना रवी राठोडचा वाढदिवस साजरा केला. टोळक्याने आरडाओरडा करुन दहशत माजविली.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस तेथे पोहोचले. पसार झालेल्या आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक पवार तपास करत आहेत.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

 

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.