Type Here to Get Search Results !

पुण्यात दोन सख्या भावांकडून तरुणावर अनैसर्गिक अत्याचार, मोबाइलमध्येही केलं शूट

 


पुणेदि.२२ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स):  राज्यात अत्याचार बलात्कार, विनयभंगाच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी पुण्यात सासऱ्याने सूनेचा विनयभंग केल्याची घटना ताजी असतानाचा आता पुण्यातून आणखी एक संतापजनक बातमी समोर आली आहे. पुण्यात दोन सख्या भावांकडून तरुणावर अनैसर्गिक अत्याचार झाल्याची घटना घडली.

दोन सख्या भावांनी पुण्याला काळीमा फासण्याचे कृत्य केल्याचे समोर आले आहे. ग्रामीण भागातील १९ वर्षीय तरुणाला रस्त्यात अडवण्यात आले. तसेच त्याला मारहाण करत फ्लॅटवर नेण्यात आले. यानंतर याठिकाणी त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही भावांना अटक केली आहे. शोहेब अन्सारी (वय ३५) आणि अन्वर अन्सारी (वय ४०), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

या घटनेतील पीडित तरुण हा आरोपींच्याच गावाकडील असल्यामुळे तो आरोपींना ओळखतो. रात्री अकराच्या सुमारास कामावरून तो घरी निघाला होता. दरम्यान, घराजवळ आल्यानंतर आरोपी शोहेबने दुचाकीवरून येऊन त्याला रस्त्यात मारहाण केली. इतकेच नव्हे तर त्याला दुचाकीवरून त्याच्या घरी नेले. तसेच त्याठिकाणी मोठ्या भावालाही बोलावून घेतले.

यानंतर दोघांनी मिळून तरुणासोबत अनैसर्गिककृत्य केले. त्याचे शुटींग अन्वर अन्सारी याने त्याच्या मोबाईलमध्ये केले. तसेच त्यानंतर त्याच्यावर अतिप्रसंग करण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला, अशी तक्रार त्याने दिली आहे. याप्रकरणी १९ वर्षाच्या पिडीत तरुणाने तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार कोंढव्यातील दुराणी कॉम्प्लेक्समध्ये सोमवारी रात्री अकरा ते साडेअकरा या वेळेत घडला आहे. पुढील तपास कोंढवा पोलीस करत आहेत.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.