Type Here to Get Search Results !

संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज पालखी साेहळयात भाविकांचे दागिने चोरणाऱ्या चोरट्यांची टोळी जेरबंद



पुणे दि.०४ ऑगस्ट (चेकमेट टाईम्स): देहू व आळंदी येथून पंढरपूरला प्रस्थान करणाऱ्या संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर पालखी सोहळयात भाविकांचे दागिने चोरणारी टोळी पुणे गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या पथकाने जेरबंद केली आहे. ४ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांनी पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहरात केलेले चैन चोरीचे १८ गुन्हे उघडकीस आल्याचची माहिती अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिली आहे.

शंकर शिवाजी पवार (वय २३,रा.पाथर्डी, अहमदनगर), महेंद्र सुरेश अरगडे (२६, रा.पाथर्डी, अहमदनगर), नितीन छगन काकडे (२२,रा.पाथर्डा, अहमदनगर) व प्रशांत छगन टाक (२६,रा. पाथर्डा, अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका सोनसाखळी चोरीच्या गुन्हयाचा तपास गुन्हे शाखेचे युनिट सहाचे पथक करत होते. तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की, संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या पुण्यातून पंढरपुरकडे जात असताना पालखी मार्गावर तसेच विसावा ठिकाणी दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात. त्यामुळे तेथे झालेल्या गर्दीचा गैरफायदा घेऊन लोकांचे गळयातील सोन्याचे दागिने बळजबरीने चोरणारे आरोपी शंकर पवार व महेंद्र अरगडे हे आळंदी-पुणे रस्त्यावर थांबलेले आहे.

माहिती मिळताच युनिट सहाच्या पथकाने सापळा लावून संबंधित दोन आरोपी शंकर पवार व महेंद्र अरगडे यांना सुरुवातीला ताब्यात घेतले. त्यांच्याकडील चाैकशीत त्यांचा साथीदार नितीन काकडे यासही पोलिसांनी अटक केली. त्यांनी पालखी मार्गावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या गर्दीत सोन्याचे दागिने चोरल्याची कबुली दिली. चोरलेले दागिने त्यांनी प्रशांत टाक यास विक्री केल्याचे सांगितल्याने पोलिसांनी त्यालाही अटक केली. त्याच्या ताब्यातून चोरीचे एकूण २४ तोळे वजनाचे १२ लाख २४ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त करुन त्यास अटक केली आहे. तसेच, अटक आरोपींचे एक लाख ३० हजार रुपये किंमतीचे दोन महागडे मोबाईल ही जप्त करण्यात आले आहे.

ही कामगिरी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त संदीप कर्णीक, पोलीस उपआयुक्त श्रीनिवास घाडगे, सहा.पोलीस आयुक्त नारायण शिरगावंकर, वपोनि गणेश माने, पोउपनि भैरवनाथ शेळके,पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, रमेश मेमाने, कानिफनाथ कारखेले, बाळासाहेब सकटे, प्रतिक लाहीगुडे, ऋषिकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, अश्पाक मुलाणी, ज्योती काळे, सुहास तांबेकर यांच्या पथकाने केली आहे.


वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.