Type Here to Get Search Results !

सुजय विखे आणि सुप्रिया सुळे यांच्यातील कलगीतुरा या अधिवेशनात देखील सुरूच



पुणे दि.०४ ऑगस्ट (चेकमेट टाईम्स): राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी लोकसभेत दत्त दत्त, दत्ताची गाय, गायीचं दूध, दुधाची साय, सायीचं दही, दहीचं ताक, ताकाचं लोणी, लोण्याचं तूपअशी मराठी कविता वाचून दाखवली. या कवितेतील केवळ दत्त आणि गाय सोडली तर केंद्र सरकारने सर्व वस्तूंवर जीएसटी लावला आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.

सुप्रिया सुळे यांच्या या टीकेला भारतीय जनता पार्टीचे खासदार सुजय विखे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत सुंदर उदाहरण दिलं, पण तीच राष्ट्रवादीची परंपरा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीने दुधापासून निघणारा कोणताच पदार्थ सोडला नाही, अशी बोचरी टीकाही सुजय विखे पाटलांनी केली आहे. यावर आता सुप्रिया सुळे यांनी अवघ्या आठ शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी स्मितहास्य करत सुजय गोड मुलगा आहे, माझ्या त्याला शुभेच्छा आहेतअसं प्रत्युत्तर दिलं आहे.

आरोप-प्रत्यारोप होत असताना सुप्रिया सुळेंनी सुंदर उदाहरण दिलं आहे. पण हीच राष्ट्रवादी काँग्रेसची परंपरा आहे. त्यांनी दुधातून निघणारा कोणताही पदार्थ सोडलेला नाही. सत्तेच्या माध्यमातून जे-जे काही काढता येईल, मग तो पैसा असेल, भ्रष्टाचार असेल, वेगवेगळ्या पक्षातून लोकांचं प्रवेश करणं असेल, दबावतंत्र वापरणं असेल, लोकांवर गुन्हे दाखल करून पक्षप्रवेश करून घेणं असो, असे अनेक प्रकार त्यांनी केले आहेतअशी टीका सुजय विखे पाटलांनी केली आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/  

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.