Type Here to Get Search Results !

तुषार भोसले भामटा, त्यांच्यामुळे वारकरी बदनाम होतायत; रुपाली पाटील यांचे टीकास्त्र


 पुणे, दि. 16 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स):  अलीकडच्या दिवसांपासून सुषमा अंधारेंनी हिंदू देवी-देवतांना आणि साधु-संतांबद्दल करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यावरून महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील काही मंडळी आक्रमक झाले आहेत. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

 

सुषमा अंधारेंनी केलेल्या वक्तव्यावरून भाजपा अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी टीका केली आहे. आमच्या हिंदू देवी-देवतांवर आणि संत परंपरेवर टीका करणाऱ्यांना पक्ष भाड्याने चालवायला दिला की काय परिणाम होतो, हे उद्धव ठाकरेंच्या लक्षात आलं असेल. देवी-देवतांचा आणि संतांचा अपमान करणारे आज पक्षाचे प्रवक्ते म्हणून राज्यभर भटकत आहेत. तसेच, आमच्या देवी-देवतांवर गरळ ओकत आहेत,” असे तुषार भोसलेंनी म्हटलं होतं.

 

यामुळे सुषमा अंधारेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.

 

यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली-पाटील ठोंबरे यांनी भोसलेंचा समाचार घेत भाजपा आणि शिंदे गटावर टीकास्त्र सोडलं आहे. सुषमा अंधारेंनी शिवसेना प्रवेश करून पाच महिने झाले. त्यांचे व्हिडीओ, ते फार जुने आहेत. तेव्हा वारकरी समाज आणि ह.भ.प. महिला कुठे होत्या. हे वारकरी समाजाचे नसून शिंदे आणि भाजपाने तयार केलेले आहेत. कारण, शिंदे गट आणि भाजपाचा भांडाफोड सुषमा अंधारेंनी केला आहे,” असे रुपाली पाटील यांनी सांगितलं.

 

पुढे बोलताना वारकरी संप्रदायात तुषार भोसले नावाचं भामटं पोरगं आलं आहे. ते स्वत:ला वारकरी समजतात, पण ते वारकरी नाही आहेत. त्यामुळे वारकरी संप्रदायाला कुठेतरी गालबोट लागत आहे. भाजपाच्या चोरट्या, अविचारी आणि धुर्त राजकारणी या लोकांना कोणीही आपल्या क्षेत्रात घेऊ नका. हे आपल्या क्षेत्राचं वाटोळं करून, माता बहिणींमध्ये झुंज लावण्याचं काम करतात,” असेही रुपाली पाटील यांनी ‘चेकमेट टाईम्स’शी बोलताना सांगितलं.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

 

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.