Type Here to Get Search Results !

३१ डिसेंबरला पानशेतच्या उपसरपंचाच्या घरी चोरी; कोथरूड, धायरी मध्ये घरफोड्या

 

पुणे, दि. 3 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): पुण्यात होणाऱ्या गुन्हांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असतांना दिसत आहे. अशीच वेगवेगळ्या जागी घरफोडी केल्याची बातमी समोर आली आहे. सिंहगड आणि कोथरूड भागात चोरट्यांनी दोन फ्लॅट फोडून तब्बल 64 लाखांवर डल्ला मारला आहे. धायरीत चोरट्यांनी पानशेतच्या उपसंरपचाचे घरफोडून 23 लाखांचा ऐवज चोरला आहे. खासगी कंपनीतून निवृत्त झालेल्या व्यक्तीच्या घरातून 41 लाखांचा ऐवज चोरला आहे.

 

पहिली घटना कोथरूडमधील पौड रोडवर घडली असून, चोरट्यांनी बंद फ्लॅट फोडून तब्बल 41 लाख 16 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी 79 वर्षीय व्यक्तीने कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदार पौड रस्त्यावरील रामबाग कॉलनीत एका सोसायटीत राहण्यास आहेत. ते एका खासगी कंपनीतून निवृत्त झालेले आहेत. त्यांची एक मुलगी दुबईत असते. तिला भेटण्यासाठी ते 13 डिसेंबर रोजी गेले होते. ते परत 27 डिसेंबर रोजी आले. यादरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व घरातील 32 लाखांचे दागिने, हिर्‍याचे 7 लाखांचे दागिने व रोकड असा एकूण 41 लाख 16 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

 

तर दुसऱ्या घटनेप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात आशिष पासलकर (वय 33, रा. धायरी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, अज्ञात तीन चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार भरदुपारी घडला आहे. तक्रारदार हे मुळचे पानशेतमधील असून, ते पानशेतचे उपसंरपच आहेत. त्यांचे हॉटेल देखील आहे. राहण्यास धायरीमधील पार्थ संकुल येथे आहेत. हॉटेलवर गर्दी झाल्यानंतर ते त्याच ठिकाणी थांबतात. दरम्यान, थर्टीफस्टच्यानिमित्त ते हॉटेलात गेले होते. त्यावेळी गर्दी असल्याने ते त्याच ठिकाणी थांबले होते. यादरम्यान, चोरट्यांनी दरवाजाचे लॉक तोडून आत प्रवेश केला. तसेच, घरातील सोन्याचे दागिने व रोकड असा एकूण 23 लाख 53 हजारांचा ऐवज चोरून नेला.

 

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी हा प्रकार समोर आला. सिंहगड पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, तक्रारदार यांच्या सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. त्यात चोरटे कैद झाले आहेत. मास्क परिधान केलेले तीन चोरटे दुचाकीवरून आल्याचे यात दिसत आहे. त्यामुळे त्यांची ओळख पटू शकलेली नाही.

 

दोन्हीही प्रकरणात पोलीस तांत्रीक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा माग काढत आहेत आणि याबात पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहेत.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes  

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes  

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84 


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.