Type Here to Get Search Results !

बसमध्ये धक्का मारून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या माथेफिरूला कोथरूड पोलिसांनी ठोकल्या बेड्या

 

पुणे, दि. 21 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): पुणे शहरातील आणि परिसरातील बसमध्ये महिलांसोबत गैरवर्तन करण्यात येत असल्याचे अनेक प्रकार याआधी देखील समोर आलेले आहेत. मात्र पुन्हा एकदा असाच प्रकार कोथरूड परिसरात उघडकीला आला आहे. एका व्यक्तीने सातत्याने पाठलाग करून बस प्रवासामध्ये धक्का मारून एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. या माथेफिरू व्यक्तीला कोथरूड पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत. (Kothrud police arrested person who molested a minor girl in a bus.)

 

एका 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीने त्याच्या विरोधात पोलिसात फिर्याद दिलेली आहे. प्रेम चंदू पवार (वय 29 रा. पिरंगुट) असे आरोपी व्यक्तीचे नाव आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही नळस्टॉप बस वरून ये जा करत असते. मागच्या गुरुवारी (दि. 12 जानेवारी 2023) बसने जात असताना पवार याने तिच्यासोबत बोलण्याचा बहाना केला आणि माझ्यासोबत मैत्री करशील का? असे विचारत तिचा हात हातात पकडला आणि माझ्यासोबत चल तुला चहाची पार्टी देतो, असे देखील तो म्हणाला.

 

पीडित मुलगी आपल्याकडे दुर्लक्ष करते आहे हे लक्षात येऊन देखील त्याने पुन्हा शनिवारी (दि. 14 जानेवारी 2023) ती बसने प्रवास करत असताना तिचा पाठलाग करत तिच्याकडे पाहून वेगवेगळे स्वरूपाचे हावभाव केले आणि तिचा विनयभंग केला. घरी आल्यानंतर पीडित मुलीने हा प्रकार आपल्या घरच्यांना सांगितला त्यानंतर कुटुंबीयांनी कोथरूड पोलिसांकडे जाऊन त्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकलेल्या असून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे समजते.

 44444444444444444444444444444444

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84      

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.