Type Here to Get Search Results !

गावठी कट्टा बाळगणाऱ्या परराज्यातील तरुणासह दोघे गजाआड

 

पुणे, दि. 24 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): पुणे शहरामध्ये विनापरवाना गावठी कट्टा (Gavathi Katta) विक्री करण्यासाठी आलेल्या परराज्यातील तरुणासह दोघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch) अंमली पदार्थ विरोधी पथक 1 (Anti Narcotics Cell) ने अटक (Arrest) केली आहे.

 

अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून गावठी कट्टा, मोबाईल असा एकूण 85 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई (Pune Crime News) नगर रोडवरील वाघोली (wagholi) येथे करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) आर्म अॅक्ट (Arm Act), महाराष्ट्र पोलीस अॅक्ट (Maharashtra Police Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

 

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-नगर रोडवरील वाघोली येथील सातव हायस्कूल बस स्टॉप (Satav High School Bus Stop) समोर दोनजण गावठी पिस्तुल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार प्रविण उत्तेकर, संदीप शिर्के यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता 20 हजार रुपये किमतीचा एक गावठी कट्टा आढळून आला. पोलिसांनी आरोपींकडून गावठी कट्टा, दोन मोबाईल असा एकूण 85 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. शुभम शांताराम शिसवाल (वय-19 रा. गांधीनगर, मुगर रोड, खंडवा, मध्यप्रदेश), सनी संजय जेधे (वय-24 रा. ई वॉर्ड, लोणावळा, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr IPS), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -1 सुनिल पवार (ACP Sunil Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड (Police Inspector Vinayak Gaikwad), सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे (API Laxman Dhengle), शैलजा जानकर (API Shailaja Jankar), पोलीस अंमलदार प्रविण उत्तेकर, संदिप शिर्के, मारुती पारधी, सुजित वाडेकर, मनोजकुमार साळुंके, योगेश मोहिते, विशाल दळवी, विशाल शिंदे, पांडुरंग पवार, राहुल जोशी, सचिन माळवे, संदेश काकडे, नितेश जादव, रेहाना शेक यांच्या पथकाने केली.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84  

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.