Type Here to Get Search Results !

९ महिन्यांपूर्वी वकिलाचा खून करून पसार झालेल्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पौड पोलिसांना यश

पुणे, दि. 1 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): नऊ महिन्यांपूर्वी जमिनीच्या वादातून झालेल्या खूनप्रकरणी फरार असलेल्या आरोपीला पौड पोलिसांनी अटक केली. (murder over land dispute)

वकील मिलिंद दत्तात्रय शिवणकर (वय 60, रा. कोथरूड, पुणे) असे मयताचे नाव आहे. प्रतिक राजकुमार गुप्ता (वय 20, मूळ रा.बिहार) असे आरोपीचे नाव असून त्याच्या चार साथीदारांसोबत शिवणकर यांचा खून केला. त्यांनी खून मुख्य आरोपी विक्रांत सुभाष कांबळे (रा. कासारआंबोली, ता. मुळशी) यांच्या सांगण्यावरून केला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, कासारआंबोली (kasaraamboli) येथील जमिनीच्या व्यवहारामध्ये जाणीवपूर्वक कायदेशीर अडचणी निर्माण करीत असल्याचा राग मनात धरून शिवणकर यांचे मे 2022 मध्ये पिरंगुट (pirangut) येथील घाटातून अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्यांचा खून करून मृतदेह लोणावळ्यातील (Lonavala) टायगर पॉइंट येथील दरीत टाकून दिला. खुनाच्या घटनेनंतर गुप्ता हा फरार झाला होता.

आरोपी भूगावला (bhugaon) येणार असल्याची गोपनीय माहिती सहायक पोलीस निरीक्षक रमेश गायकवाड, पोलीस हवालदार रॉकी देवकाते यांना मिळाली. त्यानुसार पौड पोलिसांच्या पथकाने सापळा लावून आरोपीस अटक केली. यातील इतर चार आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले पाटील, पौडचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रमेश गायकवाड, हवालदार रॉकी देवकाते, हवालदार आबा सोनवणे, शिपाई साहिल शेख, अक्षय यादव, आकाश पाटील, होमगार्ड अरुण जाधव यांनी केली.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com       

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes       

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes     

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/     

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times    

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes     

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes    

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84       

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.