Type Here to Get Search Results !

बोपदेव घाटात पोलिसांनाच लुटण्याचा प्रयत्न; चार चोरटे झाले पोलिसांच्या जाळ्यात ट्रॅप


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news

पुणे, दि. 7 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): चोरट्यांना (thieves) पकडण्यासाठी लावलेल्या सापळ्यातील पोलिसांनाच धमकावून लुटण्याचा (threatened and robbed) प्रयत्न केला. (pune crime news)

 

हा प्रकार बोपदेव घाटात (Bopdev Ghat) घडला. बोपदेव घाटात फिरायला येणाऱ्या नागरिकांना धमकावून लूटमार करण्याच्या घटना नेहमी घडतात. त्यामुळे अशाच गुन्ह्यांसाठी काही महिन्यांपूर्वीच पोलिसांनी बोपदेव घाटात पोलीस चौकी सुरू करण्यात आली होती.

पोलिसांना लुटल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी चार चोरट्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीचे आठ गुन्हे उघडकीस आले आहेत.

 

यश रमेश ढेबे (वय 19), विशाल रामनिवास गौतम (वय 19), वसीम अब्दुल अजीज शाह (वय 25) आणि दीपक रमेश सुतार (वय 25, सर्व रा. कात्रज) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून पाच दुचाकी, मोबाईल आणि चाकू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोपदेव घाटात चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी चोरट्यांचा माग काढण्यास सुरवात केली होती. त्यानुसार तपास पथकातील साध्या वेशातील पोलिसांनी सापळा रचला. बोपदेव घाटात सामान्य नागरिकांप्रमाणे साध्या वेशातील दोन पोलीस कर्मचारी गप्पा मारत थांबले होते. त्या वेळी आरोपी ढेबे, गौतम, शाह, सुतार आणि त्यांच्या बरोबर असलेल्या एका साथीदाराने साध्या वेशातील पोलिसांना चाकूचा धाक दाखविला. पोलीस कर्मचाऱ्यांकडील मोबाईल (mobile) हिसकाविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने आरोपींना त्वरित पकडले. त्यांच्या बरोबर असलेला एक साथीदार पसार झाला.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com       

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes       

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes     

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/     

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times    

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes     

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes    

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84    

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.