Type Here to Get Search Results !

नगर आणि नाशिकचे ते दोघे पुण्यात आले होते करायला कोणाचा तरी गेम; पोलिसांच्या खबऱ्याने साधला नेम

 


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news)

पुणे, दि. 9 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): गंभीर गुन्हा करण्याच्या दृष्टीने बेकायदेशीररीत्या पिस्तूल (Pistol) बाळगणार्‍या दोघांना बिबवेवाडी पोलिसांनी (Bibwewadi Police) अटक केली. (pune crime news)

आकाश उद्धव कोपनर (Akash Uddhav Kopner) (21, गोकुळनगर, कात्रज-कोंढवा रोड, मूळ रा. अहमदनगर) आणि सनी विनोद मेहरा (Sunny Vinod Mehra) (26, रा. गोकुळनगर, कात्रज, मूळ रा. नाशिक) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्या जवळील गावठी कट्टा (Gavthi Katta) आणि जिवंत काडतुसे (Cartridges) जप्त करण्यात आली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. 1 फेब्रुवारी 2023 रोजी बिबवेवाडी पोलीस तपास पथकातील अधिकारी आणि कर्मचारी परिसरात सायंकाळच्या सुमारास गस्त घालत असताना पोलीस अंमलदार अतुल महांगडे (Atul Mahangade) यांना दुचाकीवरून दोन जण गंगाधाम चौकात आले असून, त्यांच्या कमरेला पिस्तूल असल्याची माहिती त्यांना मिळाली. तसेच ते गंभीर गुन्हा करणार असल्याचेही त्यांना समजले.

त्यानंतर पथकाने घटनास्थळी जाऊन दोघांना थांबवत त्यांची अंगझडती घेतली असता, कमरेला पिस्तूल व त्यांच्याकडे एक जिवंत काडतूस आढळून आले. या प्रकरणी कोपनर आणि मेहरा यांच्यावर कारवाई केली आहे. कोपनर याच्यावर लूटमार केल्याचा दौंड पोलीस ठाण्यात, तर मारहाण केल्याचा गुन्हा कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता जाधव (Senior Police Inspector Sangeeta Jadhav), सहायक निरीक्षक प्रवीण काळुखे (Assistant Inspector Praveen Kalukhe), उपनिरीक्षक संजय आदलिंग (Sub Inspector Sanjay Adaling), अंमलदार रवींद्र राऊत (Ravindra Raut), संतोष जाधव (Santosh Jadhav), अतुल महागडे (Atul Mahagade), शिवाजी येवले (Shivaji Yeole), प्रणय पाटील (Pranay Patil), राहुल शेलार (Rahul Shelar) यांनी केली.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84       

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.