Type Here to Get Search Results !

बेकायदेशीर धंद्याची तक्रार दिल्याने नगरसेवकावर जीवघेणा हल्ला


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news

 

पुणे, दि. 15 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): सासवड (aswad) परिसरात सुरू असलेल्या अवैध व्यवसायांबाबत (Illegal Business) पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याच्या रागातून ‘कोयता गँग’ने (koyta gang) माजी नगरसेवकावर हल्ला केला. याबाबत सासवडचे माजी नगरसेवक गणेश बबनराव जगताप (Former corporator of Saswad Ganesh Babanrao Jagtap) यांनी सासवड पोलीस ठाण्यात (Saswad Police Station) फिर्याद दिली आहे. (pune crime news)

ही घटना रविवारी (दि. 12 फेब्रुवारी 2023) रात्री घडली. सूरज ऊर्फ बिट्टू चंद्रकांत माने (suraj / bittu chandrakant mane), ओंकार जाधव (Omkar Jadhav), सनी माने (Sany Mane), अनिकेत जाधव (Aniket Jadhav), श्रीजय जाधव (Shreejay Jadhav) यांच्यासह अनोळखी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील सूरज माने (Suraj Mane) राजकीय पदाधिकारी आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी (Police custody) सुनावण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास गणेश जगताप त्यांच्या आनंद प्लाझा (Anand Plaza) येथील कार्यालयात बसले असताना त्यांचा मुलगा प्रेम जगताप सोपाननगर येथून कार्यालयात आला. या वेळी 5 ते 6 मुले चारचाकी गाडीतून पाठलाग करीत असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर प्रेम त्याच्याकडील दुचाकीने, तर फिर्यादी गणेश जगताप यांच्याकडील चारचाकीने घरी जाण्यास निघाले.

गणेश जगताप कार ‘पार्क’ करीत असताना आरोपी तेथे आले. त्यांच्या हातात धारदार कोयते, लाकडी दांडकी होती. त्यांनी जगताप यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान दाखवून जगताप गाडीतच बसून राहिले. यामुळे हल्लेखोरांनी त्यांच्या कारची तोडफोड केली.

“आमच्या मटक्याच्या धंद्याला आडवा येतो का, तुझ्यामुळे आमचे आर्थिक नुकसान झाले आहे, तुला आज जिवंत सोडणार नाही,” असे म्हणून आरोपींनी कारवर कोयत्याने वार केले. या वेळी सासवडचे माजी नगरसेवक गणेश जगताप यांनी जवळील परवानाधारक पिस्तूल (licensed pistol) काढल्याने हल्लेखोर पळून गेले.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.