Type Here to Get Search Results !

पुणे शहर पोलिसांवर हल्ला करून पसार झालेला आरोपी टेंभूर्णी मध्ये पकडला

 


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news)

पुणे, दि. 8 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): मोक्काच्या गुन्ह्यातील (MCOCA crime) आरोपी तपासादरम्यान मार्केट यार्ड पोलिसांवर (Market Yard Police) हल्ला करुन पसार झाले. ही घटना खानापूर (khanapur) येथे घडली होती. संतोष बाळू पवार (Santosh Balu Pawar) (वय 26 वर्षे, राहणार. पानशेत रोड, खानापूर, ता. हवेली) असे आरोपीचे नाव आहे. (pune crime news)

या आरोपीला बिबवेवाडी पोलिसांनी (Bibwewadi Police) भिगवण (Bhigwan) येथे तब्बल एक किलोमीटर पाठलाग करुन पकडले. याप्रकरणी आरोपी पळून गेल्याप्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात (Haweli police station) चौघांवर खूनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 1 फेब्रुवारी 2023) सायंकाळी घडली.  

मिळालेल्या माहितीनुसार, मार्केटयार्ड परिसरात पिस्तुलाचा धाक दाखवून पंचवीस लाख रुपयांचा दरोडा अविनाश रामप्रताप गुप्ता (Avinash Rampratap Gupta) व त्याच्या टोळीने टाकला होता. पोलिसांनी या टोळीला पकडल्यानंतर मोक्का लावण्यात आला होता. दरम्यान गुन्हयाचा तपास करण्यासाठी संतोष पवार आणि आणखी एका गुन्हेगारास खानापूर येथे नेले होते.

संतोष पवार याच्या घरी तपास सुरु असताना तीघेजण तीथे दाखल झाले. तेथे संतोष पवार याने अचानक हातातील बेडीला झटका मारुन पोलीस कर्मचाऱ्यांच्या पासून सुटका करुन घेतली. तो पळत असताना त्याच्या मागे आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर बेडीने हल्ला चढवला.

यानंतर दुचाकीवर बसून पळून जात असताना एका पोलीस कर्मचाऱ्याने दुचाकी पकडली असता, त्याला काही अंतरावर फरफटत नेले. यानंतर आरोपी दुचाकीवरुन पळून गेले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला, मात्र ते सापडू शकले नाही. दरम्यान आरोपीचा शोध हवेली पोलीस आणि मार्केटयार्ड पोलीस करत होते. मार्केटयार्ड पोलिसांना तांत्रीक विश्‍लेषणात तो भिगवण येथे असल्याची माहिती मिळाली. मात्र पथक भिगवणला जाईपर्यंत आरोपीने त्याची जागा बदलली असती.

दरम्यान बिबवेवाडी पोलिसांचे एक पथक त्यांच्या कडे दाखल असलेल्या गुन्हयातील आरोपीला शोधण्यासाठी भिगवणला होते. मार्केटयार्ड पोलिसांनी त्यांना सहकार्य करण्याची विनंती केली. त्यानुसार बिबवेवाडी पोलिसांचे पथक संतोष पवारच्या मागावर केले. पोलिसांना बघून संतोष पवारने पळ काढला. तपास पथकाने तब्बल एक किलोमीटर पाठलाग करुन त्याला जेरबंद केले.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84       

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.