Type Here to Get Search Results !

खडकवासला मतदार संघात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ; स्थानिक रहिवासी हैराण

 


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news

 

पुणे, दि. 20 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): गेल्या अनेक दिवसांपासून सिंहगड (sinhagad) – पानशेत (panshet) भागात मोकाट कुत्र्यांसह (Dogs) जनावरांचा धुमाकूळ सुरू आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यात शालेय विद्यार्थ्यांसह नागरिक जायबंदी होत असून, मोकाट कुत्री दररोज दहा जणांचा चावा घेत असल्याचे गंभीर चित्र पुढे आले आहे. (pune news)

मोकाट जनावरांच्या उपद्रवामुळे भाजीपाल्यासह उभ्या पिकांचे नुकसान (destroying crops) सुरू आहे. मोकाट जनावरे, कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी यंत्रणा नसल्याने स्थानिक प्रशासन हतबल झाले आहे. पानशेत, वांजळवाडी, कुरण खुर्द, आंबी, रानवडी, कादवे भागात 40-50 गाई - बैल आणि वासरे अशा मोकाट जनावरांचा कळप धुमाकूळ घालत आहे.

पावसाळा संपल्याने रानात ओला चारा मिळत नाही. त्यामुळे मोकाट जनावरे थेट ज्वारी, गहू पिकासह भाजीपाला रातोरात फस्त करत आहेत. मोकाट जनावरे दिवसा घनदाट जंगलात आसरा घेतात आणि रात्रीच्या वेळी बाहेर पडतात. शेतकर्‍यांचा सुगावा लागताच क्षणात पिकाची नासाडी करुन पसार होतात. त्यामुळे शेतकर्‍यांना पिकांची राखण करण्यासाठी रात्रभर धावपळ करावी लागत आहे.

आंबीच्या सरपंच मंगल निवंगुणे (Aambi Sarpanch Mangal Niwangune) म्हणाल्या की,“निसर्ग, रोगांच्या प्रादुर्भावापेक्षा मोकाट जनावरांचे शेतीवर नवीन संकट उभे आहे. मोकाट जनावरे शेतकर्‍यांच्या पाळीव जनावरांवरही हल्ला करत आहेत.”

आंबी येथील शेतकरी शंकरराव निवंगुणे (Shankarao Nivangune) म्हणाले की,”मोकाट जनावरांनी बांधावरील पावटा, शेतातील मका, ज्वारी कडधान्याची पिके टोळधाडी सारखी फस्त केली आहेत. अनेक शेतकर्‍यांनी मोकाट जनावरांमुळे शेती करणे बंद केले आहे.”

खानापूर येथील जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वागत रिंढे (Zilla Parishad Health Center Medical Officer Dr. Swagat Rinddhe) म्हणाले,“कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे दररोज चार ते पाच रुग्ण येतात. गेल्या पाच सहा महिन्यांत अशा रुग्णांत वाढ झाली आहे. गंभीर रुग्णांना उपचारासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात येते.”

वन, कृषी, महसूल व पोलीस प्रशासनाने समन्वय साधून मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. खडकवासला येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातही मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमीं झालेले रुग्ण मोठ्या संख्येने उपचारासाठी येत आहेत. दाट लोकवस्तीच्या उत्तमनगर, शिवणे, सिंहगड रोड भागात मोकाट कुत्र्यांच्या सुळसुळाट सुरू आहे. सिंहगड भागात अलिकडच्या पाच-सहा महिन्यांत शंभराहून अधिक मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट सुरू आहे.

मोकाट कुत्र्यांनी चावा घेतलेल्या रुग्णांची संख्या महिनाभरात शंभराहून अधिक झाली आहे. कुत्र्यांनी चावा घेतलेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. हे लक्षात घेऊन आरोग्य विभागाने खडकवासला, पानशेत, खानापूर येथील आरोग्य केंद्रात रेबीज लसीचा साठा उपलब्ध केला आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.