Type Here to Get Search Results !

संत सोपानदेव समाधी मंदिरात प्रभू विश्वकर्मा महाराज जयंती सोहळ्याचे आयोजन

 


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news)

पुणे, दि. 8 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): पुरंदर तालुक्यातील (Purandar District) सुतार कारागीर (Carpenter) खऱ्या अर्थाने आर्थिक चक्रात अडकले आहेत. सर्वत्र यांत्रिकीकरण (Mechanization) झाले असून आर्थिक अडचणीमुळे पारंपारिक कारागिरांना नव्या आव्हानांना तोंड देणे शक्य होत नाही. परिणामी नवनवीन साधने, अवजारे घेऊन ग्राहकांना सेवा देताना कसरत करावी लागत आहे.

ही परवड थांबविण्यासाठी पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या कारागिरांना नवीन यांत्रिक साधने उपलब्ध करून दिली तर वेगवेगळ्या माध्यमातून उद्योग निर्मिती करण्यात येईल. मात्र, त्यासाठी समाजाने एकत्रित येऊन आधुनिक व्यावसायिक प्रशिक्षण घ्यावे. तसेच सहकारी संस्था स्थापन करून शासनाच्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी प्रयत्नशील राहावे., असे आवाहन पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी केले आहे.

सासवड (Saswad) (ता. पुरंदर) येथील संत सोपानदेव समाधी मंदिरात पुरंदर तालुका विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेतर्फे प्रभू विश्वकर्मा महाराज जयंती (vishwakarma jayanti) सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. आमदार संजय जगताप (MLA Sanjay Jagtap) यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून आरती करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल वामदेव मानकर (District President Vamdev Mankar) यांचा आमदारांच्या हस्ते विशेष सत्कार केला.

या प्रसंगी संघटनेचे संस्थापक बाळासाहेब क्षिरसागर (Founder Balasaheb Kshirsagar), सामाजिक कार्यकर्ते मुन्नाशेठ शिंदे (Social activist Munnasheth Shinde), माजी नगरसेवक मनोज म्हेत्रे (Former corporator Manoj Mhetre), समाज संघटनेचे कार्याध्यक्ष राजाभाऊ दीक्षित (Executive president Rajabhau Dixit), उपाध्यक्ष प्रदीप भालेराव (Vice President Pradeep Bhalerao), सचिव प्रकाश भालेराव (Secretary Prakash Bhalerao), खजिनदार विजय खैरे (Treasurer Vijay Khaire), नथू मोरे (Narthu More), अजित सुतार (Ajit Sutar), अनंता सुतार (Ananta Sutar), युवराज भालेराव (Yuvraj Bhalerao), पांडुरंग कळकंबे (Pandurang Kalkambe), रामदास केदारी (Ramda Kesari), राहुल भालेराव (Rahul Bhalerao), शरद मोरे (Sharad More), घनश्याम घोगरे (Ghanshyam Ghogare), सोमनाथ शिळीमकर (Somnath Shilimkar) आदींसह तालुक्यातील समाज बांधव, महिला उपस्थित होते.

दरम्यान, जयंतीनिमित्त सकाळी संत सोपानदेव महाराज समाधीची महापूजा (Sant Sopandev Maharaj Samadhi) करण्यात आली. तसेच भजनी मंडळाच्या वतीने संगीत भजन झाले. गणेश महाराज राऊत (Ganesh Maharaj Raut) यांचे प्रवचन झाले. यानिमित्त सुतार समाजातील ज्येष्ठ मंडळींचा आमदार जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन तालुकाध्यक्ष संभाजी महामुनी यांनी केले. तर नथू मोरे यांनी आभार मानले.

“सुतार समाजाला तालुक्याचे मुख्यालय म्हणून सासवड शहरात किंवा परिसरात शासनाच्या माध्यमातून जागा उपलब्ध करून द्यावी. तसेच बहुद्देशीय सामाजिक सभागृह उभारून द्यावे. यामध्ये विश्वकर्मा महाराज यांची मूर्तीची स्थापना करावी, तसेच कारागिरांना प्रशिक्षण, कर्ज तसेच व्यवसायासाठी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी.” असे पुरंदर तालुका विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेचे अध्यक्ष संभाजी महामुनी यांनी सांगितले.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84       

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.