Type Here to Get Search Results !

Pune Leopard News: 80 दिवसांमध्ये 8 बिबट्यांच्या बछड्यांचा मृत्यू; पुणे जिल्ह्यातील आकडेवारी’ने खळबळ

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

8 leopard cubs die in 80 daus at manchar forest range office - checkmate times

पुणे, दि. 20 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): आंबेगाव (Ambegaon) तालुक्याच्या पूर्व भागात मंचर वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या (Manchar Forest Range Office) कार्यक्षेत्रात गेल्या दीड महिन्यात आठ बछड्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामध्ये एक वर्षाच्या आतील दोन, दीड महिन्यांचे दोन, 15 दिवसांचे दोन व 40 दिवसांच्या दोन बछड्यांचा समावेश आहे. (pune news)

शवविच्छेदनाच्या अहवालानुसार (Autopsy reports) आईची ऊब, दूध न मिळाल्याने उपासमारी व थंडीमुळे मृत्यू झाल्याची निरीक्षणे नोंदविण्यात आली आहेत. विधानसभेत प्रश्नोत्तरे तासात माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Former Home Minister Dilip Valse Patil) यांनी बिबट्यांची वाढत चाललेली संख्या व मानवावर होत असलेल्या हल्ल्याबाबत चिंता व्यक्त केली. याबाबत वनखात्याने तातडीने उपयोजना हाती घेण्याबाबत त्यांनी सूचना केली.

दिलीप पाटील म्हणाले,”बिबट्यांची संख्या हा शहरी व ग्रामीण भागात वाढता प्रश्न असून, बिबटे माणसांवरही हल्ले करू लागले आहेत. मतदारसंघात 15 दिवसांपूर्वी चार बिबटे मृतावस्थेत आढळले. त्यांचे शवविच्छेदन केल्यावर उपासमारीमुळे त्यांचा मृत्यू झाला, असा अहवाल आला आहे. बिबट्यांची प्रजननक्षमता कमी करण्याचे नियोजन वनअधिकाऱ्यांकडे आहे. ते समजून घेऊन प्रजनन कमी करता आले; तर त्याचा फायदा होईल.”

हेही वाचा - Viral Video: पुण्यात घुसलेल्या बिबट्याला पकडण्यात यश; न्यू अहिरेगाव, वारजे माळवाडी मध्ये सकाळी सकाळी घुसला होता बिबट्या

याबाबत मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस (Manchar Forest Range Officer Smita Rajahans) यांच्याशी संपर्क साधला त्या म्हणाल्या,”बिबट्या दोन वर्षांचा होईपर्यंत त्याच्या आईसोबत असणे गरजेचे आहे. त्यामुळे त्याला दूध व सकस आहार मिळतो. पण, ऊसतोडणी सुरु असल्याने बिबटे सैरावैरा झाले आहेत. अनेकदा मादी जागा बदलत असते. अशावेळी आई व बछड्यांची ताटातूट होते. त्यांना दूध मिळत नाही. उपासमारीमुळेच बछड्यांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे. सापडलेले बछडे वनकर्मचाऱ्यांमार्फत सुखरूपपणे मादीच्या सहवासात जातील, अशा पद्धतीचे काम सुरु आहे. गेल्या दोन महिन्यात सहा बछड्यांना मादीकडे सुपूर्त करण्यात वनखात्याच्या कर्मचाऱ्यांना यश आले आहे.”

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                           

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes                      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes                    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/                    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes                    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n        

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://moja p.in/@checkmatetimes                 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.