Type Here to Get Search Results !

Pune Crime News | वारजे माळवाडी मधील हॉटेल आम्रपाली जवळ जोडप्याला लुटले; महिन्यातील दुसरी घटना

 Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, checkmate news, chekmet news

Hotel Amrapali Restaurant & Bar warje malwadi pune


पुणे, दि. 26 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): वारजे माळवाडी (Warje Malwadi) मधील हॉटेल आम्रपाली बार अँड रेस्टॉरंट (Hotel Amrapali Restaurant & Bar) जवळ एकाला लुटल्याच्या घटनेला एक महिना पूर्ण होण्याअगोदरच त्याचं भागात आणखीन एक लुटमारीची घटना (robbery incident) समोर आली असून, दुचाकीवरून चाललेल्या पती पत्नीला (Husband Wife) अडवून, त्यांच्याकडील ऐवज चोरण्याचा प्रयत्न (attempt to theft) करण्यात आला. तर ऐवज मिळून न आल्याने त्यांच्या गाडीवर लोखंडी शस्त्राने हल्ला (Attack by Weapon) करून, घटनास्थळावरून ते निघून गेल्याबाबत वारजे पोलीस स्टेशन (FIR in Warje Police Station) मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Shitole Heights Warje Karvenagar Pune



याबाबत वारजे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार दि. 24 मार्च 2023 रात्री सव्वा अकराच्या सुमारास पत्नीसह दुचाकी मोटारसायकलवरून आपल्या वारजे पूल (Warje Bridge) ते आरएमडी कॉलेज (RMD College) रस्त्याने घरी निघालेल्या अनुराग शरद हिवाळे (वय. 26 रा. वारजे माळवाडी, पुणे) (Anurag Sharad Hiwale) यांना हॉटेल आम्रपाली बार अँड रेस्टॉरंट जवळ, केटीएम दुचाकी शोरूम (KTM Bike Showroom, Warje Malwadi, Pune) समोर अँकटीवा (Honda Activa) स्कूटरवरून आलेल्या दोघांनी, मोटारसायकलला स्कूटर आडवी लावून, हिवाळे यांना त्यांच्याकडील लोखंडी हत्याराचा धाक दाखवून, दमदाटी, शिवीगाळ (Thret) करत त्यांच्याकडील पैशांची मागणी केली. यावेळी त्यांच्याकडे पैसे (Cash) अथवा कोणताही ऐवज मिळून न आल्याने, दोघांनीही जवळील धारदार हत्याराने हिवाळे यांच्या मोटारचालकच्या टाकीवर घाव टाकून निघून गेले. याबाबत हिवाळे यांनी वारजे पोलिसात तक्रार दिली आहे.


LIC KANYADAN POLICY



याबाबत माहिती मिळताच वारजे पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन, परिसराची नाकाबंदी करत, संशयितांना शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो निष्फळ ठरला. गेल्या काही दिवसांपूर्वीच बुधवार दि. 1 मार्च 2023 रोजी अशाचप्रकारे दुचाकीवरून आलेल्या दोघांनी, याच भागात एका तरुणाला लुटून, त्याच्याकडील 41 हजार 200 रुपयांचामुद्देमाल, हिसकावून, चोरून नेल्याची घटना घडली होती. त्यातील संशयितांचा शोध लागण्यापूर्वीच घडलेल्या या घटनेने वारजे परिसरात खळबळ उडाली आहे. वारजे पोलीस संशयितांचा कसून शोध घेत आहेत.


LIC EDUCATION POLICY



वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

 

आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.