Type Here to Get Search Results !

Chandrashekhar Bawankule: राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे महाराष्ट्राला लागलेली कीड; चंद्रशेखर बावनकुळे यांची सडकून टीका

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

chandrashekhar bawankule criticises udhhav thackrey - checkmate times

पुणे, दि. 28 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी इंदापूर तालुक्यात रविवारी (दि. 26 मार्च 2023) भाजपा युवा मोर्चा आणि युवा वोरीयर्सच्या 52 शाखांची उद्घाटने पार पडल्यानंतर रात्री उशिरा माध्यमांशी बोलत असताना ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे महाराष्ट्र आणि देशाला लागलेली कीड आहे, अशी जहरी टीका चंद्रशेखर बावनकुळे (State President of BJP Chandrasekhar Bawankule) यांनी केली आहे.

यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (EX-Minister Harshvardhan Patil), आमदार गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar), गणेश भेगडे (Ganesh Bhegde), विक्रांत पाटील, अनुप मोरे, दिपक काटे, पृथ्वीराज जाचक, रंजन तावरे, दिलीप खैरे, विलास वाघमोडे, ॲड. शरद जमदार आदी मान्यवर उपस्थित होते.

‘मी अडीच वर्ष मुख्यमंत्री होतो या काळात एक दिवस दाखवा की मी हिंदुत्व सोडलं आहे.’ असं खुलं आव्हान उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीला दिलेयं. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलेयं. 100 वेळा हिंदुत्व सोडलंय आणि एक हजार उदाहरणे देता येतील कशाला तोंड उघडता, आता अशा शब्दात उत्तर देत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस जेव्हा हिंदुत्वाची चिरफाड करत होती तेव्हा ठाकरे शांत बसत होते. ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्यामुळेच एकनाथ शिंदेंना 50 आमदारांना घेऊन निर्णय घ्यावा लागला आणि राज ठाकरेंना देखील शिवसेनेतून बाहेर यावे लागले. त्यामुळे हिंदुत्वाचा अपमान तुम्ही जेवढा केला तेवढा या देशात कोणीच केला नसल्याची टीका बावनकुळे यांनी केली.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान (Insulting Swatantryaveer Savarkar) होताना अनेक वेळा तुम्ही बघितला आहे आणि आता म्हणत आहात की आम्ही सावरकरांचा अपमान सहन करणार नाही. तर मग त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही का बसला आहात? असा सवाल उपस्थित करत एकीकडे मांडीला मांडी लावून बसता आणि दुसरीकडे त्यांनी केलेला अपमान सहन करायचा नाही असे म्हणता. यावरून उध्दव ठाकरे हे दुतोंडी आहेत, अशी टिका बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

हेही वाचा - Pune News: कोथरूड मध्ये शिवसेनेला धक्का; अखेर श्याम देशपांडे कार्यकर्त्यांसह भाजपा’मध्ये डेरेदाखल

माझ्या कुळाचा उल्लेख करून उद्धव ठाकरेंना आनंद मिळतोय. माझ्या कुळाचा उल्लेख करतात, यावरूनच ते किती घाबरलेत हे दिसत आहे. पुढे महाराष्ट्रात काय होतंय ते पहा. आज जे उरलेसुरले आहेत त्यातील चारच राहतील. आम्ही हिंदुत्वाचे रक्षण करणारे कार्यकर्ते आहोत, तुमच्यासारखे पळपुटे नाही अशा शब्दात बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंना इशारा दिला.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                            

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes              

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n        

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84  

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.