Type Here to Get Search Results !

मैत्रिणीला हॉटेलवर घेऊन गेला; दारु पिताना चकणा म्हणून व्हीआग्रा खाल्या आणि झालं भलतंच

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news


 

पुणे, दि. 8 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): मद्यपान करताना व्हायग्राच्या (Vigara) गोळ्या खाल्ल्याने नागपुरात (Nagpur) एका 41 वर्षीय व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. यावर ‘Journal of Forensic and Legal Medicine’ने अभ्यास प्रसिद्ध केला आहे. केस स्टडीमध्ये (Case Study) डॉक्टरांनी मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट केलं आहे. (pune news)

केस स्टडीमध्ये डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, ही व्यक्ती आपल्या हॉटेलमध्ये आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी गेला होता. यावेळी त्याने Viagra च्या ब्रँडखाली विकल्या जाणाऱ्या sildenafil च्या दोन गोळ्या (Tablets) खाल्ल्या होत्या. यावेळी तो मद्यपानही (wine) करत होता. दरम्यान, या व्यक्तीला कोणताही वैद्यकीय त्रास नव्हता किंवा सर्जरी (Surgery) झालेली नव्हती.

दुसऱ्या दिवशी सकाळी या व्यक्तीला त्रास जाणवू लागला. त्याला सतत उलट्या होत होत्या. यानंतर त्याच्या मैत्रिणीने वैद्यकीय मदत घेण्याचा सल्ला दिला. पण त्याने आपल्याला याआधीही असा त्रास झाला आहे सांगत डॉक्टरांकडे जाण्यास नकार दिला. पण प्रकृती बिघडू लागल्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. पण तिथे दाखल होताच त्याला मृत घोषित करण्यात आलं.

डॉक्टरांच्या मते, सेरेब्रोव्हॅस्कुलर  हॅमरेजमुळे (Cerebro vascular hemorrhage) त्याचा मृत्यू झाला. मेंदूला ऑक्सिजनचा होणारा पुरवठा (lesser supply of oxygen to brain) या स्थितीत कमी होतो. अभ्यासात दिलेल्या माहितीनुसार,"कोणताही मेडिकल किंवा सर्जिकल भूतकाळ नसणारा 41 वर्षीय व्यक्ती हॉटेलमध्ये आपल्या मैत्रिणीसह वास्तव्यास होता. त्याने रात्री मद्यपानासह sildenafil च्या (50 mg each) दोन गोळ्यांचं सेवन केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी अस्वस्थ जाणवू लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण दाखल होण्यापूर्वीच त्याला मृत घोषित करण्यात आलं".

शवविच्छेदनात डॉक्टरांना 300 ग्रॅम गोठलेलं रक्त आढळलं आहे. मद्य आणि औषधाचं मिश्रण केल्याने तसंच आधीच असणारा उच्च रक्तदाब यामुळे त्याचा मृत्यू झाला. अभ्यास प्रसिद्ध कऱणाऱ्या लेखकांनी वैद्यकीय सल्ल्याशिवाय इरेक्टाइल डिसफंक्शन (Erectile Dysfunction) औषधे घेताना असणारे धोके लोकांना कळावेत आणि जागरुकता व्हावी, यासाठी हा अभ्यास प्रकाशित केला आहे. दरम्यान, डॉक्टरांनी या गोळ्याचं सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेण्यास सांगितलं आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes               

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes             

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/             

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times            

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes             

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes           

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n             

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes          

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.