Type Here to Get Search Results !

धरणावर पार्टी करायला जाणे बेतले जीवावर; पोहता येत नसल्याने एकाचा बुडून मृत्यू

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

drowning in water- checkmate times

पुणे, दि. 13 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): भामा आसखेड धरण (Bhama Aaskhed Dam) परिसरात मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या एका 34 वर्षीय युवकाचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना खेड तालुक्यातील करंजविहीरे येथे घडली आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. (pune news)

हेही वाचा - पार्टीतली मस्ती बेतली जीवावर, स्विमिंगपूल मध्ये बुडून तरुणाचा मृत्यू

याबाबत गजानन लक्ष्मण भारती (Gajanan Lakshman Bharati) यांनी महाळुंगे पोलिसांना (Mahalunge Police) माहिती दिली. दत्ता वसंत भारती (Datta Vasant Bharati)  (रा. लक्ष्मी रोड, भारती मठ, वाशी, जि. धाराशिव) असं बुडून मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. भारती यांच्या आकस्मिक जाण्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दत्ता हा काल रोजी त्याच्या तीन मित्रांसोबत भामा आसखेड धरणाच्या बंधाऱ्याजवळ असणाऱ्या जलसाठा परिसरात पार्टी करण्यासाठी आला होता. त्यावेळी हे तिघे मित्र पार्टी करत असतांना दत्ताचा पाण्यात तोल गेला आणि तो पडला. त्याला पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडू लागला. मित्रांनी त्याला वाचवण्यासाठी आरडाओरडा केला. मात्र, दत्ता तोपर्यंत बुडाला होता.

हेही वाचा - धायरीतील शेततळ्यात बुडून दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

रविवारी (दि. 12 मार्च 2023) सकाळी अकराच्या सुमारास मावळ तालुक्यातील (Maval Taluka) वन्यजीव रक्षक संस्थेच्या (Wildlife Conservation Society) कार्यकर्त्यांना मृतदेह शोधण्यासाठी पाचारण करण्यात आले. पोलिसही यावेळी घटनास्थळी दाखल झाले होते. रेस्क्यू टीमने (Rescue Team) दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर संबधित युवकाचा मृतदेह बाहेर काढला.

या कामगिरीत वन्यजीव रक्षक मावळ संस्था आणि आपदा मित्र संस्थेचे संस्थापक नीलेश गराडे (Nilesh Garade, founder of Apda Mitra Sanstha), अध्यक्ष अनिल आंद्रे (President Anil Andre), भास्कर माळी (bhaskar mali), गणेश गायकवाड (ganesh gaikwad), शुभम काकडे (shubham kakade), विनय सावंत (vinay savant), विकी दौंडकर (viki daundkar), जिगर सोलंकी (jigar Solanki), सत्यम सावंत (satyam savant), सचिन वाडेकर (Sachin wadekar), श्रीयश भेगडे, अनिश गराडे, सार्थक घुले, गणेश सोंडेकर, कमल परदेशी, शांताराम गाडे, श्रीकांत बिरदवडे, सचिन भोपे, नितीन गाडे, पोलिस पाटील सचिन मरगज, विक्रांत चौधरी आदींनी मदत केली.

हेही वाचा - खडकवासला सोनापूर जवळ प्रेमी युगुलाची आत्महत्या? दोघांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळले

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                       

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes                   

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes                 

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/                 

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes                 

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes               

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes              

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.