Type Here to Get Search Results !

Velhe Crime: या कारणासाठी केला पप्पूशेठ रेणुसेचा खून; संशयित अद्याप फरारच

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

पुणे, दि. 8 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): जमिनीच्या वादातून वेल्हे तालुक्यातील पाबे गावातील तरुण नवनाथ उर्फ पप्पू शेठ नामदेव रेणुसे (Navnath alias Pappu Sheth Namdev Renuse) (वय - 38) याचा वेल्ह्यातील हॉटेल विसावा (Hotel Visava Velhe) मध्ये गोळ्या झाडून (firing) तोंडावर धारदार शस्त्र ने वार करून निर्घृण खून (murder in velhe) केल्याची घटना सोमवार (दि. 6 मार्च 2023) रोजी घडली. (Pune News)

याप्रकरणी सुरेश नामदेव रेणूसे (Suresh Namdev Renuse) (वय - 45) राहणार पाबे, ता. वेल्हे यांनी याबाबत फिर्याद दिली असून आहे. वेल्हे पोलिसांनी आरोपी ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली लक्ष्मण रेणुसे (Dnyaneshwar alias Mauli Laxman Renuse) (रा. पाबे, ता. वेल्हे, जि. पुणे) व इतर अज्ञात 4 जणांवर गुन्हा दखल करण्यात आला. आरोपी फरार असल्याची माहिती वेल्ह्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार (Velhe Assistant Police Inspector Manoj Pawar) यांनी दिली आहे. (Pune Crime News)

हेही वाचा - Velhe Crime: भर दुपारी रिअल इस्टेट व्यावसायिकाचा निघृण खून, वेल्हे गावातील घटना

मिळालेल्या माहितीनुसार, सात ते आठ वर्षांपूर्वी आरोपी माऊली रेणुसे याने मरळ आवाडातील जमीन खरेदी केली होती. याबाबत कोर्टात केस चालू होती तर याबाबत जमीनी बाबत मयत नवनाथ हा मरळ आवाडातील लोकांना आरोपी विरुध्द काहीतरी काड्या करत असून लोकांना एकाचे दोन सांगत असल्याचा संशय माऊली रेणूसे याच्या मनात होता.

हेही वाचा - खेड-शिवापूर येथील टोलनाक्यावर आज पासून स्थानिकांची टोलमाफी रद्द; टोलनाक्यावर वाद निर्माण होण्याची शक्यता

हा राग मनात धरून माऊली ऊर्फ ज्ञानेश्वर रेणुसे याने त्याच्या चार साथीदारासह वेल्हे येथील हॉटेल विसावा मयत नवनाथ ऊर्फ पप्पू नामदेव रेणुसे (रा. पाबे ता. वेल्हे जि. पुणे) याचेवर पिस्टल मधुन गोळ्या झाडुन व धारदार चाकुने व सत्तुरने चेहऱ्यावर वार करुन खून केला. या घटनेमुळे तालुक्यात भितीचे वातावरण निर्माण झाले असून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

घटनास्थळी पोलीस अधिकारी अपर पोलीस अधीक्षक नितेश गट्टे (Additional Superintendent of Police Nitesh Gatte), उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील (Sub Divisional Police Officer Dhananjay Patil), स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अविनाश शिळीमकर (Avinash Shilimkar of the Local Crime Investigation Branch) यांनी भेट घेऊन आरोपींचा शोध चालु असुन अधिक तपास वेल्ह्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार करत आहेत. (Pune Crime News)

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com             

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes           

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/           

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times          

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes           

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes         

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n           

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes        

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.