Type Here to Get Search Results !

Raghuram Rajan: बँका बुडत आहेत, हा तर फक्त टीझर, पिक्चर अभी बाकी है; माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा खळबळजनक दावा

कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी व्हा.

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

raghuram rajan bank crisis - checkmate times

पुणे, दि. 11 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): अमेरिका आणि युरोपमधील सुरू असलेल्या बँकिंग संकटावर (Banking Crisis In US and Europe) ओढवले असून आगामी काळात हे बँकिंग संकट अधिक गडद होणाच्या शक्यतेचा इशारा भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन (Former RBI Governor Raghuram Rajan) यांनी दिला. (bank crisis)

अलीकडेच अमेरिकेतील दोन मोठ्या बँका बुडाल्या तर युरोपातील आघाडीची बँक क्रेडिट सुइसवर (Credit Suisse) विक्रीची वेळ ओढवली. राजन म्हणाले की,”एका दशकापासून मध्यवर्ती बँकांना सुलभ पैसे आणि प्रचंड तरलतेचे व्यसन लागले असून आता केंद्रीय बँका धोरण कडक करत आहेत, ज्यामुळे आर्थिक व्यवस्थेत संकट निर्माण झाले आहे.”

पुढे राजन म्हणाले की,"सिलिकॉन व्हॅली बँक ऑफ अमेरिका आणि क्रेडिट सुईस बँक ऑफ स्वित्झर्लंडच्या प्रकरणांचा विचार करता, जागतिक बँकिंग प्रणालीमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. अशा स्थितीत जगातील बँकिंग व्यवस्था एका मोठ्या धोक्याकडे वाटचाल करत आहे.’

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे माजी मुख्य अर्थतज्ज्ञ रघुराम राजन  (Former Chief Economist of IMF Raghuram Rajan) यांनीही 2008 च्या मंदीचे अचूक भाकीत केले होते. ते म्हणाले की,“गेल्या दशकापासून बँकांकडून कर्ज सहज उपलब्ध होते, कारण त्यांच्याकडे तरलतेची कमतरता नव्हती, ज्यामुळे आर्थिक व्यवस्थेत 'व्यसन' निर्माण झाले. मात्र गेल्या काही महिन्यांपासून जगभरातील केंद्रीय बँकांनी आपली आर्थिक धोरणे कडक केल्याचा परिणाम आता आर्थिक व्यवस्थेवर दिसून येत आहे.”

बँकिंग व्यवस्थेतील मोठ्या समस्यांबद्दल बोलताना ते म्हणाले कि,”सिलिकॉन व्हॅली बँक आणि क्रेडिट सुईस बँकेचे संकट दर्शवते की बँकांमधील आर्थिक समस्येचे मूळ खोलवर आहे. बँकांच्या चलनविषयक धोरणांचा प्रभाव खूप खोल आहे, जो हाताळणे सोपे काम नाही हे आम्ही विसरलो आहोत. अशा स्थितीत त्याचा परिणाम थेट बँकिंग व्यवस्थेवर दिसून येतो.”

राजन यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे (IMF) मुख्य अर्थतज्ज्ञ म्हणून काम केले असून युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो बूथ स्कूल ऑफ बिझनेस (University of Chicago Booth School of Business) मध्ये शिकवणारे राजन 2013 ते 2016 पर्यंत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर राहिले. माजी आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन यांनी 2005 मध्ये मुख्य अर्थतज्ज्ञ असताना 2008 मध्ये बँकिंग संकटाचे बाकीच्या केले होती, जे 2008 मध्ये खरे ठरले. त्यावेळी तत्कालीन अमेरिकन ट्रेझरीने राजन यांचा इशारा विकासविरोधी ठरवून फेटाळून लावला होता, मात्र 2008 मध्ये अमेरिकेतील बँकिंग संकटाने रघुराम राजन यांचे म्हणणे खरे असल्याचे सिद्ध केले.

हेही वाचा - Pune Crime: रोझरी एज्युकेशन ग्रुपच्या संचालकांना ईडी’चा दणका; स्थावर मालमत्तेवर टाच

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                             

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes             

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/       

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes       

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.