Type Here to Get Search Results !

'आमच्याकडे लायसन्स आहे, वेळ वाया घालवू नका!'; असा पुण्यातील वाहतुक पोलिसांना टोमणा

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

we have license please dont waste time board in pune - checkmate times

पुणे, दि. 3 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): पुणेरी तरुणाईने इंस्टा रील्स (Insta Reels) करून त्यात ‘आमच्याकडे लायसन्स आहे आणि आम्हाला थांबवून तुम्ही आमचा आणि तुमचा वेळ वाया घालवू नका,’ असे लिहिलेले फलक हाती घेऊन त्यांनी दुचाकीवरून जात असताना वारंवार गाडी बाजूला घेण्यास सांगणार्‍या वाहतूक पोलिसांना (Pune Traffic Police) पुणेरी भाषेत चांगलेच टोमणे मारले आहेत. वाहतूक पोलीस आणि आरटीओकडून सध्या चौकाचौकात दुचाकीस्वारांना थांबवून जोरदार कारवाई सुरू आहे.

त्यामुळे वैतागलेल्या पुणेकर तरुणाईने मुठा नदीपात्रात (mutha river) इंस्टाग्रामच्या माध्यमातून एक रील्स तयार केले आहे. यात दोन तरुण दुचाकीवरून जाताना आणि नदीपात्रातील घाटावर एक फलक हाती घेतलेले दिसत आहेत. त्या फलकावर ‘लायसन्स आहे, थांबवून आमचा आणि तुमचा वेळ घालवू नये,’ असे लिहिलेले आहे.

याच व्हिडीओमध्ये दुचाकीवरून जाणार्‍या तरुणांच्या हातातील फलक पाहून जाताना एक तरुण त्यांना विचारतो की,”ठीक आहे, तुमच्याकडे लायसन्स आहे. पण हेल्मेट कुठे आहे?” त्यावर दुचाकीवरून जाणारा तरुण त्याला म्हणतो,”आमचा आणि हेल्मेटचा 36 चा आकडा आहे.” यावरून पुणेकर आणि वाहतूक पोलीस यांच्यात वाहतूक नियमांवरून चांगलीच धुमसत असल्याचे दिसत आहे.

या व्हिडीओला ‘आम्ही पुणेरी…’ हे गाणे लावण्यात आले आहे. त्यामुळे हा व्हिडीओ सध्या व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हिडीओला 12 हजार 300 ‘लाईक्स’ आले आहेत. तर हा व्हिडीओ ‘इंस्टा’वरच 3,369 जणांनी शेअर केल्याचे दिसत आहे.

पुणे शहर परिसरात जानेवारी ते मार्च 2023 या तीन महिन्यांच्या कालावधीत 96 अपघातांमध्ये 100 वाहनचालकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती वाहतुक पोलिसांनी दिली. याचाच अर्थ कि, रोज एक अपघाती मृत्यू होत आहे. मात्र, तरीदेखील पुणेकर याकडे गांभीर्याने पहात नसल्याचे दिसत आहे.

शहरातील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर मागील काही महिन्यांत पुणे आरटीओने (Pune RTO) केलेल्या अभ्यासात दुचाकीस्वारांचेच सर्वाधिक अपघात होत असल्याचे समोर आले आहेत. यात अनेक तरुणांना अपघातामध्ये आपले प्राण गमवावे लागले आहेत. तसेच, सर्वाधिक अपघात सायंकाळच्या सुमारास होत असून, वाहतूक नियमांचे पालन न केल्यानेच झाले असल्याचेही समोर आले आहे.

हेही वाचा - वारजे माळवाडी रस्त्याच्या रुंदीकरणासाठी हालचाली वाढल्या; मिळकतींची माहिती गोळा करण्याचे काम वेगात

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                             

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes             

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/       

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                      

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes       

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.