Type Here to Get Search Results !

Pune G20: पुण्यात जी-२० परीषदेच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक संपन्न

पुण्यातील कचरा समस्या सोडवण्यात पुणे PMC ला अपयश येते आहे का? काय उपाय करायला हवेत?

खालील लिंक वर क्लिक करून आपले मत आमच्या पर्यंत पोहोचवा.

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

G-20 conference preperation meeting - checkmate times

पुणे, दि. 10 मे 2023 (चेकमेट टाईम्स): पुणे येथे जूनमध्ये होणाऱ्या जी-20 (Pune G-20) प्रतिनिधींच्या बैठकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त सौरभ राव (Divisional Commissioner Saurabh Rao) यांच्या अध्यक्षतेखाली व भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे उपसचिव अनुपम अनिश चौहान (Anupam Anish Chauhan, Deputy Secretary, Ministry of Electronics and Information Technology) यांच्या प्रमुख उपस्थितीत विधान भवन (Vidhan Bhawan) येथे बैठक घेण्यात आली. (Pune G20 June Meeting)

बैठकीस पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, राज्याचे क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त ए. राजा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, वाहतूक पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे वैज्ञानिक संजय कौल, लवजीत सिंग, राष्ट्रीय ई-गव्हर्नन्सचे (एनजीईडी) मुख्य कार्यकारी अधिकारी जगमोहन कथैत, अनुज कौशल आदी उपस्थित होते.

जी-20 राष्ट्रसमुहाच्या परिषदेचे आयोजन भारतासह तीन देशात करण्यात आले आहे. यापूर्वी पुणे शहरात जानेवारीमध्ये जी-20 ‘इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुप’ची (Infrastructure Working Group) बैठक यशस्वीरित्या आयोजित करण्यात आली होती. आता जूनमध्ये तिसरी ‘डिजिटल इकॉनॉमी वर्किंग ग्रुप’ (Digital Economy Working Group) बैठक आणि चौथी ‘एज्युकेशन वर्किंग ग्रुप’ (Education Working Group) बैठक अशा दोन बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे.

यावेळी विभागीय आयुक्त श्री. राव यांनी सांगितले कि “जी-20 च्या जानेवारीमधील यशस्वी आयोजनाचा अनुभव लक्षात घेत सर्व आवश्यक ती पूर्वतयारी करण्यात येत आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकांनी कमीत कमी कालावधीत शहर सौंदर्यीकरणावर लक्ष केंद्रित करुन चांगले काम केले होते. पोलीस विभागाने सुरक्षिततेच्यादृष्टीने सर्व काळजी घेतली. भारताचे, महाराष्ट्राचे आणि पुण्याचे डिजिटल क्रांतीतील सामर्थ्य, समृद्ध सांस्कृतिक वारसा, वैविध्य जगासमोर आणण्यासाठी चांगल्या पद्धतीने तयारी करण्यात येत आहे,” असेही श्री. राव यांनी सांगितले.

यावेळी पुणे महानगरपालिकेने गतवेळच्या आयोजनाप्रसंगी राबविलेले उपक्रम, शहर सौंदर्यीकरण आदींविषयी चित्रफीत दाखविण्यात आली. सायकल फेरी (सायक्लॉथॉन), वॉकॅथॉन, स्वच्छतेसाठी नागरिकांचा सहभाग, शिक्षण संस्थांमध्ये जी-20 बाबत विद्यार्थ्यांसाठी माहिती सत्रांचे आयोजन, चौक सुशोभीकरण, प्रकाशमान करणे मुख्य मार्गांलगतच्या भिंतींवर आकर्षक, रंगकाम आदी उपक्रम कमीत कमी कालावधीत चांगल्याप्रकारे राबवण्यात आल्याचे आयुक्त श्री. विक्रम कुमार यांनी सांगितले. आगामी बैठकीसाठीही (Pune G-20) सर्व तयारी सुरू असल्याचे सांगण्यात आले.

क्रीडा आयुक्त श्री. दिवसे यांनी शिवछत्रपती क्रीडा संकुल (Shivchhatrapati Sports Complex) येथील पायाभूत सुविधांची माहिती दिली. बैठकीत महाराष्ट्र पर्यटन विभागाने तयार केलेल्या चित्रफीत दाखविण्यात आल्या. पुण्यातील ऐतिहासिक महत्त्वाची वारसा ठिकाणे, शैक्षणिक ठिकाणे, माहिती तंत्रज्ञान संबंधीत तसेच इतर उद्योग, पायाभूत सुविधा आदी ठिकाणी परिषदेतील प्रतिनिधींच्या भेटींचे नियोजन येईल. पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील सौंदर्यीकरणाचे काम गतीने सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

बैठकीस विभागीय आयुक्तालयाच्या उपायुक्त वर्षा उंटवाल लढ्ढा यांच्यासह पर्यटन विभाग, उद्योग विभाग, सांस्कृतिक कार्य विभाग, आरोग्य, महसूल विभाग आदींचे अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा -

(Pune Municipal Commissioner Vikram Kumar, State Sports Commissioner Suhas Diwase, Special Branch Deputy Commissioner of Police A. Raja, Zilla Parishad Chief Executive Officer Ayush Prasad, Pune Municipal Corporation Additional Commissioner Vikas Dhakne, Traffic Police Deputy Commissioner Vijaykumar Magar, Union Ministry of Electronics and Information Technology Scientist Sanjay Kaul, Lavjeet Singh, National e-Governance (NGED) Chief Executive Officer Jagmohan Kathait, Anuj Kaushal, Varsha Untwal Ladha, Deputy Commissioner of Divisional Commissionerate)

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes              

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes              

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.