Type Here to Get Search Results !

Pune Crime: बिंगो ॲपवर जुगार खेळून आर्थिक तोट्यात गेलेला कोथरूडचा सोनार झाला चोर

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

Kothrud's goldsmith who became a thief arrested by pune police - checkmate times

पुणे, दि. 12 मे 2023 (चेकमेट टाईम्स): ऑनलाइन बिंगो अ‍ॅपच्या माध्यमातून जुगार खेळून लाखो रुपये हरल्यानंतर घोरपडीतील सोपानबागेतील बंगल्यात लाखोंच्या ऐवज चोरणाऱ्या घरफोड्याला आणि सोनाराला गुन्हे शाखेच्या युनिट 5 ने बेड्या ठोकल्या. त्याच्या चौकशीत 20 लाख 92 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या घरफोड्यावर 35 गुन्हे दाखल असून त्याच्या सोनार मित्र चोरीचा ऐवज विक्री करण्यासाठी मदत करायचा. (Pune Crime News)


मुकेश बबन मुने (वय 26, राम मंदिराजवळ, सुतारदरा, कोथरूड) (Mukesh Baban Mune) आणि त्याचा साथीदार नितीन सुरेश बागडे (वय 32, रा. कवडे गल्ली, नालेगाव, अहमदनगर) (Nitin Suresh Bagade) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. मुकेश हा सराईत घरफोडी करणारा आहे, तर बागडेचे पूर्वी सोनाराचे दुकान होते.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मार्च 2023 मध्ये घोरपडीतील सोपानबागेतील बंगल्यात बंगला नूतनीकरणाचे काम चालू असताना अज्ञात चोरट्यांनी 40 लाखांचा ऐवज चोरून नेला होता. या प्रकरणात वानवडी पोलीस ठाण्यात (Wanvadi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास करीत असताना गुन्हे शाखेच्या युनिट 5 कडून 100 हून अधिक सराईत घरफोडी करणार्‍यांची तपासणी करण्यात आली. हा गुन्हा मुकेश मुने याने केल्याचे स्पष्ट झाले. तसेच तो सध्या ठाण्यातील भिवंडी येथे राहण्यास गेल्याचे समजले. (Pune Crime News)

दरम्यान, त्याचा ठाण्यात शोध घेत असताना त्याचा मित्र नितीन बागडे याच्यासोबत पुण्यात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार दोघे खराडी चौकात आले असता दोघांनाही युनिट 5 च्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडे करण्यात आलेल्या चौकशीत त्यांनी हा ऐवज अहमदनगर येथील सोनारांना विकल्याचे सांगितले. सोनार तसेच आरोपींकडून 20 लाख 92 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, अविनाश लाहोटे, अंमलदार रमेश साबळे, प्रताप गायकवाड, विनोद शिवले, शशिकांत नाळे, अकबर शेख, दयाराम शेगर यांच्या पथकाने केली. (Pune Crime News)

हेही वाचा -

(Additional Commissioner of Police Ramnath Pokle, Deputy Commissioner Amol Zende, Police Inspector Ulhas Kadam, Assistant Police Inspector Krishna Babar, Avinash Lahote, Enforcement Officer Ramesh Sable, Pratap Gaikwad, Vinod Shivle, Shashikant Nale, Akbar Sheikh, Dayaram Shegar)

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes              

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes              

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.