Type Here to Get Search Results !

PMC: अत्यावश्यक सेवा वगळता पुणे महानगरपालिका हद्दीतील रस्ते खोदाई बंद करण्याचे आदेश

मिल्खा सिंग यांना कोणत्या नावाने ओळखले जाते?

या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.


 Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

pmc order to stop road digging - checkmate times

पुणे, दि. 8 मे 2023 (चेकमेट टाईम्स): शहरातील विविध रस्त्यांवर अत्यावश्यक सेवा म्हणजेच एमएनजीएल, महावितरण (MNGL, Mahavitaran) व समान पाणी पुरवठ्याची कामे 10 मे 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. तर पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील पावसाळी गटारे व नाले सफाईची (Cleaning Roads And Pipelines) कामे 10 जून 2023 पर्यंत पुर्ण करण्याची सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. झालेल्या कामाचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना महापालिका आयुक्तांनी (Municipal Commissioner) ही माहिती दिली.

समाविष्ट गावांमध्ये 385 कोटी रुपयांची ड्रेनेज लाईनची कामे सुरू आहेत. मागील दीड वर्षांपासून ही कामे सुरू असून पुढील अडीच वर्षात कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. आराखड्यानुसार ड्रेनेज लाईनची (Drainage Line) कामे करताना काही ठिकाणी खाजगी जागेतून पाईपलाईन टाकाव्या लागणार आहेत. याला जागा मालकांचा विरोध होत आहे. अशा ठिकाणी कायद्याचा वापर करून ड्रेनेज लाईनची कामे पूर्ण करण्यात येणार आहेत.

पावसाळी कामांचा महापालिका आयुक्तांनी नुकताच आढावा घेतला. शहरात आत्तापर्यंत पावसाळी गटारे व नाले सफाईची 26 टक्के कामे पूर्ण झाली असून हे काम येत्या 10 जूनपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. गत पावसाळ्यात शहरातील रस्त्यांना आलेल्या ओढ्याच्या स्वरूपामुळे महापालिका प्रशासनावर टिकेची झोड उठली होती. यामुळे यंदा पावसाळ्यापूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याची तयारी महापालिकेने (PMC) केली आहे.

आजमितीला शहरातील रस्ते दुरूस्तीची 80 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. तसेच केबल व अन्य सेवा वाहिन्यांसाठी खोदाईची परवानगी देताना 31 मे 2023 पुर्वी खोदाई केलेल्या रस्त्यांची शास्त्रोक्त पद्धतीने दुरूस्ती करावे अन्यथा आदेशाचे उल्लंघन करणारे अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करण्याचे आदेशही अधिकार्यांना दिले आहेत.

हेही वाचा -

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes              

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes              

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.