Type Here to Get Search Results !

Trupti Desai: तर मी बारामती लोकसभा निवडणुकीत इतिहास घडवू शकते; तृप्ती देसाई यांनी व्यक्त केला विश्वास

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

trupti desai candidature for baramati loksabha matdarsangh - checkmate times

पुणे, दि. 13 मे 2023 (चेकमेट टाईम्स): भाजपमधील अनेक नेत्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून (Loksabha Matdarsangh) निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केलेली असतानाच भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई (President of Bhumata Brigade Tripti Desai) यांनी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांच्याविरोधात निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे.

“शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव पुढे येईल, असे वाटले होते. मात्र त्या तेथे सक्षम ठरल्या नसल्याचे सांगून बारामती मतदारसंघातही खासदार सुळे या सक्षम नाहीत. या लोकसभा मतदारसंघात सध्या परिवर्तन हवं आहे. गेली 15 वर्ष एकच व्यक्ती खासदार म्हणून निवडून जात आहे. शिवाय आमचा घराणेशाहीला विरोध आहे. त्यामुळे मी बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवणार आहे,” असं तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे.

“बारामती लोकसभा मतदारसंघातील अनेक भागातून निवडणूक लढवण्यासाठी नागरिकांकडून सांगितलं जात आहे. अनेकांचे पाठिंबाचेही फोन येत आहेत. त्या अनुषंगानेच मी बारामती लोकसभा मतदारसंघात जनसंपर्क दौऱ्याला सुरुवात करणार आहे. मात्र बारामती जिंकायची असेल तर भारतीय जनता पक्षाने जर मला उमेदवारी दिली, तर मी बारामतीत इतिहास घडवू शकते,” असा विश्वास तृप्ती देसाई यांनी व्यक्त केला आहे.

पुढे बोलताना देसाई म्हणाल्या की,”याआधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार हे खासदार म्हणून निवडून गेले. त्यानंतर सुप्रिया सुळे खासदार झाल्यानंतर आम्हाला आनंद झाला होता की एखादी महिला या मतदारसंघाची प्रतिनिधित्व करत आहे. मात्र १५ वर्षांपासून त्या बारामती मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत तरी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना संधी मिळेल असे वाटत होते. मात्र खासदार सुळे याच पुन्हा मतदारसंघात फिरताना दिसतात. इतक्या वर्षांपासून काम करत असणारे कार्यकर्ते-पदाधिकारी केवळ सतरंज्या उचलण्यापुरतेच आहेत काय?” असा सवाल उपस्थित करून देसाई यांनी सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला.

हेही वाचा -

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes              

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes              

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.