Type Here to Get Search Results !

वारजे माळवाडी मध्ये पाण्याच्या टाकीत पडून अडीच वर्षाच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news


Unfortunate death of two and a half year old girl after falling into water tank in Warje Malwadi


 

पुणे, दि. 14 सप्टेंबर 2023 (चेकमेट टाईम्स): वारजे माळवाडी (Warje Malwadi) मधील गोकुळनगर पठारावर (Gokulnagar Pathar) असलेल्या निलगिरी कॉलनी (Nilgiri Colony) मध्ये एका घराच्या अंडर ग्राउंड पाण्याच्या टाकीत (Under Ground Water Tank) पडून अडीच वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू (Unfortunate Death) होण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रुक्साना जमीर शेख (Ruksana Jamir Shaikh) असे पाण्यात बुडून मृत्युमुखी (Died by Drowning) पडलेल्या चीमुरडीचे नाव आहे. याबाबत वारजे पोलीस स्टेशन (Warje Police Station) मध्ये अकस्मात मयत दाखल करण्यात आला असून, वारजे पोलीस तपास करत आहेत.

 

 

याबाबत वारजे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार दि.12 सप्टेंबर 2023 सायंकाळी पाचच्या सुमारास रुखसाना शेख ही चिमुरडी घराजवळ खेळत असताना, त्यांच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या ओमनाथ गावडे (Omnath Gawade) यांच्या घराच्या झाकण तुटलेल्या अंडर ग्राउंड पाण्याच्या टाकीत पडून तिचा मृत्यू झाला. या टाकीच्या शेजारीच दुकानाचे शटर आहे. तर टाकीचे झाकण तुटल्याने त्यावर प्लायवूड (Plywood) टाकून ती झाकली जाते. मात्र रुक्साना पडली तेव्हा ते झाकण उघडे होते, की झाकलेले होते, अथवा अर्धवट उघडे होते याबाबत उलटसुलट चर्चा आहेत. दरम्यान बराच वेळ मुलगी दिसत नसल्याने, तिची आई शोधाशोध (Searching) करत असताना, मुलगी पाण्याच्या टाकीत पडलेली मिळून आली.

 

 

यावेळी तिला वारजे मधील खाजगी रुग्णालयात (Private Hospital in Warje Malwadi) उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र तिला अतिदक्षता विभागात उपचार (ICU) करण्याची गरज असल्याचे सांगत, डॉक्टरांनी तिला दुसरीकडे हलवण्याचा सल्ला दिला. यावेळी कात्रज (Katraj) मधील एका रुग्णालयात तिला हलवले असता, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मुळचे बीड जिल्ह्यातील (Beed) असलेली रुक्साना शेख ही आई, वडील आणि एका बहिणीसह येथे भाड्याच्या घरात राहत होती. तिचे वडील जमीर शेख (Jamir Shaikh) हे पेंटिंगचे (Penter) काम करतात. घराची हलाखीची परिस्थिती असताना, आलेल्या या संकटाने कुटुंबीय खचले असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत अधिक तपास वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार धनंजय देशमुख (PC Dhananjay Deshmukh) करत आहेत.

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

 

आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.