Type Here to Get Search Results !

उत्तमनगर मधील “त्या” अपहरण प्रकरणातील आरोपींवर मोक्का नुसार कारवाई

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news


Mokka action against accused in “that” kidnapping case in Uttamnagar Police Station Pune


 

पुणे, दि. 30 ऑक्टोबर 2023 (चेकमेट टाईम्स): “पुणे रेल्वे स्टेशनच्या (Pune Railway Station) बाहेरील स्टॉल मिळवुन देण्याचे काम तु केले नाहीस, तरी तु आमच्याकडून 6 लाख रुपये घेतले आहे. तु आम्हाला स्टॉल दिले नाहीत म्हणुन आमचा तोटा झालेला आहे, असे म्हणुन एका महिलेला मारहाण करुन, 6 लाख रुपयांच्या बदल्यात 17 लाख रुपयांची मागणी करत, पैसे न दिल्यास तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देवुन जबदरस्तीने संबंधित महिला आणि त्यांच्या सहकारी महिलेचे अपहरण (Kidnapping) करत, घरात नेवुन डांबुन ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला होता.” या गुन्ह्यातील आरोपींना अटक केल्यानंतर आता त्यांच्या टोळीवर मोक्का (MCOCA) नुसार कारवाई करण्यात आली आहे.

 

 

यामध्ये पोलिसांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, बाबुलाल लक्ष्मण मोहोळ (वय 45 वर्षे, रा. उत्तमनगर पुणे) (Babulal Laxman Mohol), अमर नंदकुमार मोहिते (वय 39 वर्षे, रा. गणेशनगर, एरंडवणा, ओटा वसाहत, पुणे) (Amar Nandkumar Mohite), प्रदिप प्रभाकर नलवडे (वय 38 वर्षे, रा. भुगाव, पुणे) (Pradeep Prabhakar Nalawade) आणि अक्षय मारुती फड (वय 24 वर्षे, रा. वारजे माळवाडी, पुणे) (Akshay Maruti Phad) यांना अटक करण्यात आली आहे. यातील टोळीप्रमुख बाबुलाल मोहोळ च्या पुर्व रेकॉर्डची (Criminal Record) पाहणी करता, त्याचे साथीदारासह त्याने बेकायदेशीर मार्गाने अवैध आर्थिक फायदा मिळविण्याचे उद्देशाने कोथरुड (Kothrud Police Station), अलंकार (Alankar Police Station), उत्तमनगर (Uttamnagar Police Station) या भागात आपले गुन्हेगारी वर्चस्व निर्माण करणेचे उददेशाने, गुन्हयातील साथीदार आरोपीतांना स्वतःबरोबर घेवून, स्वतः चे अधिपत्याखाली आपली संघटित गुन्हेगारी टोळी (Organized Criminal Gang) स्थापन केलेली आहे. त्याचेवर यापुर्वी पुणे शहरातील (Pune City Police) तसेच पुणे ग्रामीण (Pune Rural Police) हद्दीतील पोलीस ठाणेस खुनाचा प्रयत्न (Attempt to Murder), दरोडा (Robbery), मारामारी (Fight), गैर कायदयाची मंडळी जमवणे, बेकायदा घातक शस्त्र जवळ बाळगणे, शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन (Violation of Armistice Order), खंडणी गोळा करणे (Collection of Extortion) अशा प्रकारचे एकुण 10 गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. तसेच आपल्या संघटित गुन्हेगारी टोळीचे अस्तित्व वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी दहशत निर्माण केली आहे. यातील नमुद सदस्यांवर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई (Preventive Action) करुन देखील त्यांनी पुन्हा पुन्हा गुन्हे केलेले आहे.

 

 

दाखल गुन्हयामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 (MCOCA) च्या कलमांचा अंतर्भाव करणेकामी उत्तमनगर पोलीस स्टेशनचे (Uttamnagar Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर (PI Kiran Balwadkar) यांनी परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त सुहेल शर्मा (DCP Suhail Sharma) आणि कोथरुड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त भीमराव टेळे (ACP Bhimrao Tele) यांचे मार्फतीने पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील (IPS Pravinkumar Patil) यांना प्रस्ताव सादर केला होता. त्याला पाटील यांनी मंजुरी दिली. सदरची कामगिरी पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Pune Ritesh Kumar), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णीक (IPS Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त सुहेल शर्मा, कोथरुड विभागाचे तत्कालीन सहायक पोलीस आयुक्त सुनिल पवार (ACP Sunil Pawar) यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शबनम शेख, सहायक पोलिस निरीक्षक दादाराजे पवार (API Dadaraje Pawar), उमेश रोकडे (API Umesh Rokade), निगराणी पथकातील पोलीस अंमलदार समीर पवार (Sameer Pawar), अनिरुद्ध गायकवाड (Aniruddha Gaikwad), महिला पोलीस अंमलदार अश्विनी खाडे (Ashwini Khade) व तपास पथकातील पोलीस अमलदार तानाजी नांगरे (Tanaji Nangare), परमेश्वर पाडाळे (Parmeshwar Padale), ज्ञानेश्वर तोडकर (Dnyaneshwar Todkar) यांनी केलेली आहे.

 

 

पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पुणे शहराचा कार्यभार स्वीकारल्यानंतर, गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देवुन, गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर अधिक भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश दिलेले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखालील मकोका अंतर्गत केलेली ही 73 वी कारवाई आहे. दाखल गुन्हयाचा पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त भीमराव टेळे करत आहेत.

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा. 

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_shareTags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.