Type Here to Get Search Results !

बारामती मतदार संघात दादा गटाचे पदाधिकारी साहेब गटाच्या संपर्कात; डबल ढोलकीच्या चर्चांना उधान

Dada group officials in Baramati constituency in touch with Saheb group

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news

 

Dada group officials in Baramati constituency in touch with Saheb groupपुणे, दि. 18 नोव्हेंबर 2023 (चेकमेट टाईम्स): राष्ट्रवादी (Nationalist Congress Party) मधून एक गट घेऊन बाहेर पडत, उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) पदी विराजमान झालेल्या अजित पवारांच्या गटात (Ajit Pawar Gat) जाऊन, आजही अनेकजण दोन्ही बाजूंच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचे पाहायला मिळत आहे. असाच एक प्रसंग पुण्यातील बारामती लोकसभा मतदार संघात (Baramati Loksabha) असलेल्या खडकवासला विधानसभा (Khadakwasla Vidhansabha) मतदार संघातून पुढे आला असून, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या एका विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष असलेल्या पदाधिकाऱ्याने खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांना एका कार्यक्रमाला निमंत्रण देऊन, त्यांचा आदर सत्कार केला. त्यामुळे मतदार संघातील राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मनातील संभ्रमावस्थेत (Confusion) वाढ झाली असल्याचे पाहायला मिळते आहे. मात्र त्यांच्या या संभ्रमावस्थेमुळे मतदारांचे मनोरंजन (Voters Entertainment) होत आहे.

 

 

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे (NCP Maharashtra President Sunil Tatkare) यांचे समर्थक असलेले शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष प्रदीप उर्फ बाबा धुमाळ (Pradeep alias Baba Dhumal) आणि पुणे महानगरपालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ (Deepali Dhumal) असे त्या पदाधिकाऱ्यांचे नाव असून, दोन गट वेगळे झाल्यावर मुंबई (Mumbai) मध्ये झालेल्या मेळाव्यांमध्ये एकीकडे पती आणि दुसरीकडे पत्नीने उपस्थिती लावत, पुणे शहरात चर्चा घडवून आणल्या होत्या. त्याबाबत वृत्तपत्रांमध्ये चौकटी देखील छापून आल्या होत्या. त्यानंतर सुनील तटकरे यांनी पुण्यात झालेल्या मेळाव्यात बाबा धुमाळ यांची खडकवासला विधानसभा मतदार संघाच्या अध्यक्षपदी (NCP Khadakwasla President) नियुक्ती केली. त्यावेळी दिपाली धुमाळ या व्यासपीठावर देखील उपस्थित होत्या. मात्र त्यांची संभ्रमावस्था इतर हजारो पदाधिकारी, कार्यकर्त्यांप्रमाणे अजूनही संपली नसल्याचे समोर आले आहे.

 

 

काही दिवसांपूर्वी दिवाळी (Diwali) निमित्त दरवर्षी प्रमाणे धुमाळ यांच्या माध्यमातून आयोजित बचत गटांच्या (Womens Bachat Gat) महिलांनी बनवलेल्या वस्तूंच्या प्रदर्शन आणि विक्री (Exhibition and Sale) उपक्रमाचे उद्घाटन राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा (NCP Womens President) रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्या हस्ते करण्यात आले होते. तर याचा समारोप खासदार सुप्रिया सुळे यांच्या भेटीने करण्यात आला. हा अजब योगायोग असल्याने उपस्थित सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या नसतील तर नवल. तसे दरवर्षी तीन दिवसांच्या या उपक्रमाला राष्ट्रवादीचे मोठे पदाधिकारी भेट देत असतात. मात्र यंदा राष्ट्रवादीत दोन गट पडले आणि धुमाळ अजित पवार गटात गेल्याने, यावर्षीच्या प्रदर्शनाला नेमकं कोण कोण भेट देतं याकडे अनेकांचे डोळे लागले होते.

 

 

मात्र राजकारणात (Politics) कधीही काहीही घडू शकते, याचे जिवंत उदाहरण वारजे मधील राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना पाहायला मिळाले. ज्या दिवशी सुप्रिया सुळे यांनी या प्रदर्शनाला भेट दिली, त्याच्या दोनच दिवस अगोदर खासदार सुनील तटकरे यांच्यावर पक्षांतर बंदीचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करावी अशी मागणी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली होती. त्यानंतर अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी त्याला उत्तर देताना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षविरोधातील कारवाई केल्याप्रकरणी खासदार सुप्रिया सुळे, श्रीनिवास पाटील (Shrinivas Patil) आणि मोहम्मद फैजल (Mohammad Faisal) यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे (Election Commision) केली होती. या घटनांच्या पार्श्वभूमीवर खासदार सुळे यांची तटकरे समर्थक असलेल्या आणि अजित पवार गटाचे पदाधिकारी असलेल्या धुमाळांच्या कार्यक्रमाला उपस्थितीने सर्वाना आश्चर्याचा धक्का नसेल बसला तर नवंल. यावेळी सुळेंची ही भेट म्हणजे “धुमाळांची डबल ढोलकी” असल्याच्या चर्चा काहींनी दबक्या आवाजात केल्याचेही बोलले जाते आहे.

 

 

मात्र हीच परिस्थिती महाराष्ट्रभर असल्याचेही बोलले जाते. त्यात काहीजण उघड उघड आहेत, तर काहीजण गुपचूप आपला कार्यभाग उरकत असल्याने, राष्ट्रवादीचे दोन्ही गट पुन्हा एकत्र यावेत आशीच भावना कार्यकर्त्यांची असल्याचे दिसते. याबाबत बाबा धुमाळ यांनी “चेकमेट टाईम्स”शी बोलताना सांगितले की, सुप्रिया सुळे या विभागाच्या खासदार आहेत. त्यांना दरवर्षी या उपक्रमाला बोलावले जाते. त्यामुळे महिलांना प्रोत्साहन मिळते आणि त्या अधिक जोमाने काम करतात. त्यामुळे पक्ष म्हणून नव्हे तर या विभागाच्या खासदार आणि महिलांचे उर्जास्थान म्हणून सुळे यांना या कार्यक्रमाला बोलावले असल्याचे धुमाळ यांनी स्पष्ट केले. एकूणच प्रभागातील महिलांच्या प्रगतीसाठी आपण प्रयत्नरत असल्याचे धुमाळ यांनी अधोरेखित केले.

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.