Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news
In the name of Pradhan Mantri Kusum Yojana, one in Dahanukar Colony was cheated of lakhs
पुणे, दि. 7 नोव्हेंबर 2023 (चेकमेट टाईम्स): पाच एचपी सोलर पंप (Solar Pump) हवे असल्याने प्रधानमंत्री
कुसूम योजनेतुन (Pradhan Mantri Kusum Yojana) अनुदानावरती सोलर
पंप (Subsidized Solar Pumps) वेबसाईटवर जावुन, त्याकरीता ऑनलाईन
माहीती भरलेल्या (Online Registration for Pradhan Mantri Kusum Yojana Subsidized
Solar Pumps) पुण्यातील प्रसिद्ध अशा डहाणूकर कॉलनी (Dahanukar
Colony Kothrud) मधील व्यक्तीची विविध चार्जेसच्या नावाखाली तब्बल
पावणे दोन लाखांची फसवणूक (Cheating) झाल्याची धक्कादायक बाब
समोर आली आहे. याबाबत त्यांनी अलंकार पोलीस स्टेशन (Alankar Police Station) मध्ये तक्रार दिली असून, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संगिता पाटील (PI
Sangita Patil) तपास करत आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरुडच्या डहाणुकर कॉलनी
मधील कपील अभिजात (Kapil Abhijat, Dahanukar Colony, Kothrud) मध्ये राहत असलेल्या 49 वर्षीय फिर्यादींनी बुधवार 1 दि. नोव्हेंबर 2023
सकाळी साडेअकरा ते शुक्रवार दि. 3 नोव्हेंबर 2023 दुपारी दीड वाजण्याच्या दरम्यान,
पाच एचपी सोलर पंप हवे असल्याने प्रधानमंत्री कुसूम योजनेतुन अनुदानावरती सोलर पंप
वेबसाईटवर जावुन, नोंदणी केली. यानंतर तीन अज्ञातांनी प्रधानमंत्री कुसूम योजनेतुन
सोलर पंप देण्याच्या बहाण्याने, योजनेबाबतची वेगवेगळी कागदपत्रे पाठवुन फिर्यादी यांचा
विश्वास संपादन केला. दरम्यान वेगवेगळ्या चार्जेसच्या नावाखाली त्यांचेकडुन 1 लाख
72 हजार 980 रुपये घेवुन, कोणताही सोलर पंप न देता फिर्यादी यांची फसवणुक केली आहे.
आपली फसवणूक झाली असल्याचे फिर्यादींच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी अलंकार पोलीस
स्टेशन मध्ये अज्ञात तिघांविरोधात तक्रार दिली असून, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संगिता
पाटील तपास करत आहेत.
वरील
वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती
महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली
कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून
आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक
करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा
https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share