Type Here to Get Search Results !

हिल व्ह्यू सोसायटीच्या बांधकामावरून पडून मजुराचा मृत्यू

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, kumar builders, hill view residency, kumar properties, kumar world, hillview residency kothrud, hill view society kothrud


Laborer dies after falling from construction site of Hill View Residency


Laborer dies after falling from construction site of Hill View Residency

 


पुणे, दि. 2 डिसेंबर 2023 (चेकमेट टाईम्स): बांधकाम मजुरांच्या जीवाशी खेळ (Construction Workers Lives in Danger) चालू असल्याच्या घटना नेहमीच उजेडात येत असतात. अनेक बांधकामांवर मजुरांच्या सुरक्षेची जबाबदारी फक्त कागदावर उचललेली दिसते. मात्र प्रत्यक्षात मजुरांच्या सुरक्षेचा (Labour Security) विचार केलेला दिसत नसतो आणि त्यात मजुरांचा मृत्यू होतो. असाच एक प्रकार कोथरूडमधील (Kothrud) डुक्करखिंड (Dukkar Khind) परिसरातील हिल व्ह्यू सोसायटीमध्ये (Hill View Society) घडला असून, पडदी बसविण्याचे काम करत असताना पहिल्या मजल्यावरून खाली पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू झाल्याची (Laborer dies after falling from construction site of Hill View Residency) घटना समोर आली आहे. याबाबत कोथरूड पोलिस स्टेशन (Kothrud Police Station) मध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


 

 


बुधवार दि.29 नोव्हेंबर 2023 रोजी डुक्कर वारजे (Warje) आणि कोथरूडला जोडणाऱ्या डुक्कर खिंडीजवळ एका मोठ्या बांधकाम व्यावसायिकाच्या सुरु असलेल्या हिल व्ह्यू नावाच्या सोसायटी मधील बांधकामावर ही घटना घडली. संजय राजेंद्र ठाकूर (Sanjay Thakur) (40, सध्या रा. हिल व्ह्यू रेसिडेन्सी, कोथरूड, पुणे, मूळ रा. धनुपारा, मुजफ्फरपूर, कोल्वारा, बिहार) असे मृत्युमुखी पडलेल्या मजुराचे नाव आहे. ठाकूर आणि त्याचे साथीदार हिल व्ह्यू रेसिडेन्सी (Hill View Residency) सोसायटीमधील इमारतीमध्ये काम करत होते. या वेळी पडदी बसविण्याचे काम सुरू असतानाच ठाकूर खाली पडले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू (Death During Treatment) झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर कोथरूड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी या साईटचे सुपरवायझर, कंत्राटदार आणि ठेकेदारावर कामगाराला हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, सुरक्षा जाळी आणि सुरक्षा साधने न पुरवता,  काम करायला लावले असताना, तो तोल जाऊन पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याबाबत, गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे कोथरूड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत पाटील (PI Hemant Patil) यांनी सांगितले. तर सहायक पोलीस निरीक्षक समीर चव्हाण पुढील तपास करत आहेत. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. बांधकाम साईटवर सतत होत असलेल्या या दुर्घटनांमुळे कामगारांच्या सुरक्षिततचे प्रश्न ऐरणीवर आला आहे.

 


 


वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा.

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

 


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.