Type Here to Get Search Results !

शिवणे मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आयोजित शस्त्रास्त्र प्रदर्शन पाहण्यास लोटला जनसागर

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news


Crowds flocked to see the weapons exhibition organized on the occasion of Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti in Shivane
 


Crowds flocked to see the weapons exhibition organized on the occasion of Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti in Shivane

 

पुणे, दि. 21 फेब्रुवारी 2024 (चेकमेट टाईम्स): आखिल इंगळे कॉलनी मित्र मंडळाच्या (Akhil Ingale Colony Mitra Mandal) वतीने शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त (Shivjayanti) आयोजित केलेल्या शिवकालीन मर्दानी खेळ, शस्त्र प्रदर्शनाने (Arms Exibition) शिवणे येथे शिवकाळ जागा झाल्याच्या भावना उपस्थितांनी व्यक्त केल्यात. या भागात पहिल्यांदाच शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन भरवण्यात आल्याने नागरिकांनी सलग दोन दिवस गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये जवळपास पाच हजारांहून अधिक नागरिकांनी शिवकाळातील शस्त्रांची माहिती घेतली. विशेष म्हणजे या प्रदर्शनाला महिला आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने भेट देऊन, छत्रपती शिवरायांच्या शौर्याला मानवंदना दिली. (Salute to Chhatrapati Shivaji Maharaj)


Crowds flocked to see the weapons exhibition organized on the occasion of Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti in Shivane
 


पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या अनिता इंगळे यांच्या माध्यमातून यापूर्वी देखील या ठिकाणी ढोल ताश्यांच्या गजरात शिवराज्याभिषेक दिन (Shiv Rajyabhishek Din) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता. यावेळी देखील मर्दानी खेळांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर यावेळी एव्हरेस्ट सर केलेले सिंहगड खोऱ्यातील एव्हरेस्ट वीर लहू उघडे (Everest Hero Lahu Ughade) आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड (India Book of Records) मध्ये नोंद झालेल्या शिव दारवटकर (Shiv Darwatkar) यांचा सन्मान करत, शेकडो महिला आणि मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची महाआरती करून रयतेच्या राजाला मानवंदना देण्यात आली होती.

 

Crowds flocked to see the weapons exhibition organized on the occasion of Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti in Shivane

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरद पवार गटाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी महाराजांचे दर्शन घेत त्यांना मानवंदना दिली. माजी जिल्हा परिषद सदस्या अनिता इंगळे (Anita Ingale) व इंगळे कॉलनी मित्र मंडळाचे अध्यक्ष कुणाल इंगळे (Kunal Ingale) यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. उत्तमनगर पोलिस स्टेशनच्या सहायक पोलिस निरीक्षक अमृता चौरे (API Amruta Chaure), ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तुकाराम इंगळे, मंडळाचे कार्याध्यक्ष माऊली पासलकर, उपाध्यक्ष सुमित कांबळे, धवल इंगळे, अविनाश क्षीरसागर, तेजस कोकरे, विष्णू जगताप, करण कोळेकर, उदय साळुंखे, आशिष शर्मा, किरण गाडेकर, तुषार जानभरे, कुणाल गराडे, आशिष वाकुडे यांच्यासह पंचक्रोशीतील सर्वपक्षीय मान्यवर, साहित्य, कला, क्रीडा क्षेत्रातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

 


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.