Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, election campaign, election news, political news, business news, Marathi news today
पुणे, दि.3 जुलै
2024 (Checkmate Times): वारी आणि वारकरी याचा थेट संबंध एकादशी आणि पांडुरंगाशी
असतो. याच पांडुरंगाच्या वारकऱ्यांना आषाढी वारीची आस लागलेली असते, चंद्रभागेचे
दर्शन घेण्यासाठी ते आतुरलेले असतात. मात्र या पांडुरंगाच्या भेटीला जात असताना
वारकऱ्यांची परीक्षा घेण्यास मात्र तो विसरत नसतो. ती परीक्षा एकादशीलाच असते आणि
ती म्हणजे दिवे घाटाची अवघड चढण. मात्र वारकरी पांडुरंगाच्या नामघोषात तो सहज पार
करत असतात. या वारकऱ्यांकरवी पांडुरंगाला दंडवत पोचवण्याचे काम काही सामाजिक
कार्यकर्ते करत असतात. अशीच एक दंडवत सेवा, श्रीराम प्रतिष्ठान आणि
अखिल गणेशपुरी सोसायटी रामनवमी उत्सव वारजे यांनी केल्याचे पाहायला मिळाले आहे.
पुरस्काराच्या माहितीसाठी खालील छायाचित्रावर क्लिक करा
पावसाच्या सरींची बरसात, सुखावणारा टाळ
आणि मृदुंगाचा गजर,
खांद्यावर भगव्या पताका, हाती
चिपळ्या, मनात विठुरायाची ओढ, मुखी हरिनामाचे गोड अभंग गात भक्तिरसात चिंब भिजलेले वारकरी “संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज” पालखीच्या
मागे पुढे राहून त्या पांडुरंगाच्या दिशेने दिवे घाटातून धाव घेत होते. त्यांना
हजारो राजगिरा लाडू वाटप करत, वारकऱ्यांची एकादशी गोड करण्याचा प्रयत्न
प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे संतोष मोदी, महेश माताळे, देविदास शेट्टी, राज बडदे, प्रशांत
महानवर, श्रवण
चव्हाण, भीमराव
पाटील, मंगेश नवघणे
यांच्यासह रामसेवक उपस्थित होते. आयोजन आणि नियोजन परशुराम यादव यांनी केले होते.
पुरस्काराच्या माहितीसाठी खालील छायाचित्रावर क्लिक करा
वरील वृत्त खाली लिंक
जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल
तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता.
आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या
क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag
करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा
https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share