Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, election campaign, election news, political news, business news, Marathi news today
पुणे, दि.८ सप्टेंबर २०२४ (Checkmate Times): उत्तमनगर मध्ये एकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये जखमी तरुणावर एका खाजगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती उत्तमनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन खांदारे यांनी दिली आहे. याबाबत माहिती मिळताच पोलिस निरीक्षक मोहन खांदारे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत, परिस्थितीचा आढावा घेत, पोलिस पथकाला तत्काळ तपासाला पाठवले. त्यामुळे घटना घडल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये संशयिताला ताब्यात घेण्यात उत्तमनगर पोलिसांना यश आले आहे.
जयदीप ज्ञानोबा
भोंडेकर (वय. २२, रा. मासेआळी, उत्तमनगर, पुणे) असे या कोयता हल्ल्यात गंभीर जखमी
झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर उत्तमनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मोहन
खांदारे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक
पोलिस निरीक्षक अमृता चवरे, पोलिस उपनिरीक्षक सिद्धेश्वर रायगोंडा, अतुल क्षीरसागर,
शितल अनुसे, पोलिस हवालदार माणिक कुंभार, पंढरीनाथ कोळेकर, राजेंद्र पारेकर
यांच्या पथकाने हल्ला करून पसार झालेल्या अमित सुदाम गुजर (वय. २०, रा. मासेआळी,
उत्तमनगर, पुणे) याला ताब्यात घेण्यात यश मिळवले आहे. सहायक पोलिस निरीक्षक अमृता
चवरे पुढील तपास करत आहेत.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा
https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share