Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, election campaign, election news, political news, business news, Marathi news today, khadakwasla vidhan sabha, kothrud vidhan sabha, hadapsar vidhan sabha, parvati vidhan sabha, vadgaon sheri vidhan sabha, shivaji nagar vidhan sabha, kasba vidhan sabha, pune vidhan sabha
पुणे, दि. १५
जुलै २०२५ (Checkmate Times): "वारजे माळवाडी मधील पुणे
महानगरपालिकेच्या बारटक्के हॉस्पीटलच्या शेजारी, गोकुळनगर पठारवरून येणाऱ्या
रोडच्या उताराला एक इसम थांबलेला असून त्याच्याकडे पिस्तुल सारखी दिसणारी वस्तू
आहे, त्याने अंगावर काळ्या रंगाचा टि-शर्ट आई काळ्या रंगाची
जिन्स पॅन्ट घातलेली आहे." अशी बातमी वारजे माळवाडी पोलिसांना मिळाली आणि
पोलिसांचे पथक वेगाने माहिती मिळालेल्या ठिकाणी दाखल झाले. माहिती खरी ठरली,
संशयिताला नाट्यमयरित्या ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडती मध्ये गावठी पिस्तुल
मिळाले आणि त्याला अटक करण्यात आली.
वारजे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील
अधिकारी व अंमलदार पोलीस स्टेशन हद्दीत घडणारे गंभीर गुन्हयांना प्रतिबंध व्हावा
म्हणून पेट्रोलींग करीत असताना, पोलीस अंमलदार अमोल सुतकर यांना त्यांच्या
खात्रीशीर बातमीदाराकडून हि माहिती मिळाली होती. यानुसार परिमंडळ ३ चे पोलीस
उप-आयुक्त संभाजी कदम,
कोथरुड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त भाऊसाहेब पटारे यांचे
सुचनेनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे, पोलीस
निरीक्षक (गुन्हे) निलेश बडाख आणि प्रकाश धेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक
संजय नरळे, सिध्देश्वर रायगोंडा, पोलीस
अंमलदार अमोल सुतकर, योगेश वाघ, बालाजी
काटे, अमित जाधव, सागर कुंभार, निखील तांगडे, अमित शेलार, शरद
पोळ, अमोल झणाणे यांच्या पथकाने सदर ठिकाणी जावुन बातमीतील
वर्णनाचे इसमाचा शोध घेतला असता, पुणे महानगरपालिकेच्या कै. अरविंद बारटक्के
हॉस्पीटलच्या शेजारी वाराणसी सोसायटीकडुन अतुलनगर चौकाकडे जाणाऱ्या रोडचे कडेला
असलेल्या बस स्टॉपचे समोर, एक तरुण संशयीतरित्या हालचाल करीत
असल्याचे दिसल्याने, सदर इसमास ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता,
त्याच्याकडे गावठी बनावटीचे लोखंडी पिस्तुल आढळून आले.
विकी ऊर्फ
गंग्या विष्णू आखाडे (वय २७ वर्षे, रा. सहयोग नगर, पाण्याच्या टाकीजवळ,
वारजे माळवाडी, पुणे) असे त्याचे नाव असून, त्याच्याकडे
४० हजार रुपये किमतीचे एक चंदेरी रंगाचे धातूचे देशी बनावटीचे पिस्तुल आणि ५००
रुपये किमतीचे एक काडतूस मिळुन आले असून ते जप्त करण्यात आले आहे. यानंतर विकी
ऊर्फ गंग्या आखाडे याला अटक केल्यानंतर, त्याने सदरचे अग्नीशस्त्र कोठुन आणले, कशासाठी
जवळ बाळगले याच्या तपासकामी न्यायालयाने त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली
आहे. याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सिध्देश्वर रायगोंडा करत आहेत. आरोपी
नामे विकी ऊर्फ गंग्या विष्णू आखाडे हा रेकॉडवरील गुन्हेगार असुन त्याचेवर
यापुर्वी वारजे माळवाडी पोलीस स्टेशन मध्ये खुनाचा प्रयत्न, विनापरवाना
शस्त्र जवळ बाळगणे, वाहनांची तोंडफोड अशा प्रकारचे गंभिर
स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या
आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर
जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या
भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा.
खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा
https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

