Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, election campaign, election news, political news, business news, Marathi news today, khadakwasla vidhan sabha, kothrud vidhan sabha, hadapsar vidhan sabha, parvati vidhan sabha, vadgaon sheri vidhan sabha, shivaji nagar vidhan sabha, kasba vidhan sabha, pune vidhan sabha
५ जुलै २०२५ चे छायाचित्र
पुणे, दि. १६
जुलै २०२५ (Checkmate Times): आतापर्यंत ग्रामीण भागात असलेला लंपी सदृश रोग पुणे
शहरातील वारजे माळवाडी भागातील गाई म्हशींमध्ये आढळून आला आहे. त्यात दिवसेंदिवस
वाढ होताना दिसते आहे. मात्र याबाबत पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना माहिती
देऊन देखील महानगरपालिकेचे अधिकारी याबाबत गंभीर नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर
आले आहे. गेल्या १० दिवसांपासून अधिकाऱ्यांना याबाबत वारंवार कळवून देखील
त्यांच्याकडून कोणतीही ठोस उपाययोजना केली गेल्याचे निदर्शनास आलेले नाही. त्यामुळे
जर याकडे अशाचप्रकारे दुर्लक्ष्य होत राहिले तर यामध्ये वाढ होऊन, मोठा संसर्गजन्य
रोग शहरातील सर्व गाई म्हशींमध्ये पसरल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न या
निमित्ताने उपस्थित होतो आहे.
वारजे
माळवाडी भागातील गोकुळनगर पठार भागात शनिवार दि. ५ जुलै २०२५ रोजी एका गाईच्या
शरीराला लंपी सदृश रोग झाल्याचे आढळून आले. याबाबत एका नागरिकाने वारजे कर्वेनगर
क्षेत्रीय कार्यालयाचे महापालिका सहायक आयुक्त दीपक राऊत यांना व्हाटस अप द्वारे
फोटो पाठवून, फोनद्वारे संपर्क करत याबाबत माहिती दिली. मात्र त्यांनंतर त्यांच्याकडून
कोणत्याही ठोस उपाययोजना केल्याचे निदर्शनास आले नाही. दरम्यान मंगळवार दि.१५ जुलै
२०२५ पासून आणखीन एक बैल एकाच जागेवर थांबून असल्याचे त्याच नागरिकाला आढळून आले.
त्याने याबाबत व्हाटस अप आणि फेसबुक द्वारे गोरक्षकांकडून मदत मिळण्याची अपेक्षा
व्यक्त केली. मात्र एका गोरक्षकाने त्या व्यक्तीला फोनद्वारे संपर्क साधत त्या
बैलाला लंपी झाला असल्याचे वर्णन आणि फोटोवरूनच सांगितले. तर संबंधित गोरक्षक
देखील मदत करण्यास हतबल ठरल्याचे आणखीन एक धक्कादायक वास्तव समोर आले. त्यामुळे जर
जीव धोक्यात घालून गो-रक्षण करणारे गोरक्षक देखील अशावेळी हतबल ठरत असतील, तर
शासकीय यंत्रणा काय करत आहेत? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे.
१६ जुलै २०२५ चे छायाचित्र
गुगल वरून
मिळालेल्या माहितीनुसार
लंपी (Lumpy Skin Disease) हा एक विषाणूजन्य रोग आहे, जो गुरे आणि म्हशींमध्ये होतो. यात जनावरांच्या त्वचेवर गाठी येतात, ताप येतो आणि ते
लंगडतात. हा रोग प्रामुख्याने डास, माश्या आणि गोचिड यांच्याद्वारे पसरतो.
लंपी स्कीन आजाराची माहिती आणि कारण: हा रोग Lumpy Skin Disease Virus (LSDV)
(LSDV) नावाच्या विषाणूमुळे होतो, जो पॉक्सव्हायरस कुटुंबातील आहे.
पसरण्याची पद्धत: रोगग्रस्त
जनावरांच्या संपर्कात आल्यास, तसेच डास, माश्या आणि गोचिड यांच्या चावण्यामुळे याचा प्रसार होतो. (ज्या भागात हि
जनावरे आढळली आहेत, त्या भागात पुणे महानगरपालिकेची स्वच्छता यंत्रणा काम करत
नाही. सर्वत्र चिखलाचे साम्राज्य आहे. बीडीपी आरक्षण बाधित क्षेत्र असल्याने पुणे
महानगरपालिकेचा कर भरून देखील रस्ते, पाणी, ड्रेनेज अशा कोणत्याच सुविधा नाहीत.
माणुसकीतून कचरा उचलण्यापलीकडे कचरा उचलण्याची देखील ठोस यंत्रणा नाही.)
लक्षणे: जनावरांना ३ ते ५ दिवस ताप येतो. त्वचेवर
गाठी येतात, ज्या दोन ते पाच
सेंटीमीटर पर्यंत वाढू शकतात.
गाठींमुळे जनावरे लंगडतात. डोळे आणि नाकातून स्त्राव येतो. तोंडाला फोड
येतात.
उपाय: लसीकरण हा यावरचा प्रभावी उपाय आहे, असे पशुवैद्यकीय तज्ञ
सांगतात. लक्षणे दिसल्यास त्वरित पशुवैद्यकाशी संपर्क साधावा. जनावरांना स्वच्छ
ठिकाणी ठेवावे. डास, माश्या आणि गोचिड यांच्यापासून बचाव करण्यासाठी उपाययोजना कराव्यात.
नुकसान: या आजारामुळे जनावरांच्या त्वचेचे
नुकसान होते, ज्यामुळे त्यांच्या
चामड्याचे मूल्य घटते, असे विकिपीडियावर नमूद आहे. दुग्धोत्पादन घटते. मृत्यूदर वाढू शकतो.
लंपी स्कीन माणसांना होतो का?: नाही, लम्पी स्कीन हा एक
पशुजन्य रोग आहे, जो माणसांना होत नाही.
दूध पिणे सुरक्षित: लम्पी स्कीन झालेल्या
जनावरांचे दूध पिणे सुरक्षित आहे कारण हा नॉन-झुनोटिक आजार आहे, असे पशुवैद्यकीय
तज्ञांचे मत आहे, असे काही वेबसाईटवर नमूद आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या
आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर
जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या
भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा.
खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा
https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share


