Headlines
Loading...
चांदणी चौकाजवळ गावठी कट्ट्यासह एकजण ताब्यात; गुन्हे शाखेची कारवाई

चांदणी चौकाजवळ गावठी कट्ट्यासह एकजण ताब्यात; गुन्हे शाखेची कारवाई


 

पुणे, दि. 25 (चेकमेट टाईम्स): पौड रस्त्यावरील चांदणी चौकाजवळ असलेल्या लोहिया जैन आयटी पार्कजवळून एकाला गुन्हे शाखेच्या युनिट ३ ने गावठी कट्टा आणि दोन काडतुसांसह ताब्यात घेतले आहे. सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीत त्याच्यावर बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, दरोडा टाकण्यासारखे गंभीर गुन्हे दाखल असून, बेकायदेशीर शस्त्र बाळगलेप्रकरणी त्याच्यावर कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत गुन्हे शाखेच्या युनिट ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस अंमलदार राजेंद्र मारणे यांना खबऱ्यामार्फत अभिलेखावरील गुन्हेगार चांदणी चौकाजवळील लोहिया जैन आयटी पार्क समोर थांबलेला असून, त्याचेकडे गावठी कट्टा आहे अशी माहिती मिळाली होती.

याबाबत माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक निरीक्षक अमृता चवरे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे, पोलीस अंमलदार राजेंद्र मारणे, एकनाथ कंधारे, संतोष क्षीरसागर, हनुमंत गायकवाड, संदिप तळेकर, सुजीत पवार यांच्या पथकाने लोहिया जैन आयटी पार्कजवळ थांबलेल्या अजय शंकर सुतार (वय २१, रा. इस्कॉन मंदिर जवळ, कोंढवा, पुणे) याला चहूबाजूंनी घेराव घालत जेरबंद केले. यावेळी त्याची पंचासमक्ष झडती घेतली असता, त्याचे पॅन्टचे कमरेस एक देशी बनावटीचे पिस्टल व दोन राऊंड असा ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. सदरील देशी बनावटीचे पिस्टल आणि दोन काडतुसे जप्त करून त्याचेवर कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

#PaudRoad #ChandaniChowk #LohiyaJainITPark #KothrudPolice #SinhgadRoadPolice #PunePoliceUnit3 #Kondhawa #IskonTemple #CrimeBranchPune


0 Comments: