Headlines
Loading...
आणिबाणी काळात अटक केलेल्या पुणेकरांचा भाजपा सहकार आघाडीकडून सन्मान

आणिबाणी काळात अटक केलेल्या पुणेकरांचा भाजपा सहकार आघाडीकडून सन्मान

पुणे, दि.२५ (चेकमेट टाईम्स): काँग्रेस सरकारने २५ जुन १९७५ साली आणिबाणी कायदा लागु करून लोकशाहीची हत्या केली . मानवीय अधिकारांचे हनन आणि देशवासियांवरील विविध अत्याचार करणारी ही आणिबाणी जाहीर झाली तो दिवस देशाचे इतिहासातील काळा दिवस म्हणुन गणला जातो.

याच काळात अनेक भारतीयांना विशेषत: कॅाग्रेसविरोधी आंदोलनकर्त्यांना मिसा या कायद्या अंतर्गत अटक करून तुरूंगात डांबण्यात आले होते. त्यात अटकेत असलेल्या पुण्यातील येळगावकर दांपत्याचा सन्मान भाजपा सहकार आघाडी पुणे शहर वतीने करण्यात आला. त्यात सदानंद येळगावकर आणि डॅा.सविता येळगावकर यांना त्या काळात नागपूर विधानसभेवर झेंडा लावणे आणि गोळवलकर गुरूजी यांचा फोटो लावल्याने १५ दिवस तुरूंगात डांबले होते. 

याप्रसंगी भाजपा सहकार आघाडीचे पुणे शहर अध्यक्ष सचिन दांगट, चिटणीस चुनिलाल शर्मा, शंकर राठोड, गोवर्धन विश्वकर्मा, अजय दुबळे, किरण साबळे उपस्थित होते. 

0 Comments: