Headlines
Loading...
वारजे मधील या बँकेचे थोडक्यात बचावले एटीएम मशीन; भरदुपारी चोरट्यांनी पळवल्या इन्व्हर्टरच्या बॅटऱ्या

वारजे मधील या बँकेचे थोडक्यात बचावले एटीएम मशीन; भरदुपारी चोरट्यांनी पळवल्या इन्व्हर्टरच्या बॅटऱ्यापुणे, दि. २४ (चेकमेट टाईम्स): कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. अनेकांच्या हाताला काम नाही. त्यामुळे आगामी काळात चोऱ्या, दरोडे याचे प्रमाण वाढण्याचे अंदाज अनेकांनी बांधले आहेत. त्याचीच झलक वारजे मध्ये पाहायला मिळाली असून, वारजे मधील एसबीआय बँकेच्या एटीएम मधील इन्व्हर्टरच्या बॅटऱ्या अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सदरील चोरटे बॅटऱ्याच चोरायला आले होते, की एटीएम मशीन अथवा त्यातील पैसे याबाबत माहिती मिळाली नसून, याबाबत वारजे पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला असून, वारजे पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले तपास करत आहेत.

शुक्रवार दि.४ जून २०२१ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमाराससदरील घटना घडली असून, एसबीआयच्या झोनल ऑफिसचे व्यवस्थापक दत्तात्रय माळी (वय.६२, रा.धायरी, पुणे) यांनी वारजे पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली आहे. यामध्ये वारजे मधील महामार्गावर माई मंगेशकर रुग्णालयाशेजारी असलेल्या व्हायोला सोसायटीच्या आवारात एसबीआयचे एटीएम सेंटर असून, एटीएमच्या मागील बाजूस यूपीएस इन्व्हर्टरच्या ४० हजार रुपये किमतीच्या असलेल्या बॅटऱ्या अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्या आहेत. वारजे पोलीस तपास करत आहेत.


एकूणच या घटनेमुळे आगामी काळात एटीएम सेंटरची सुरक्षा ऐरणीवर आल्यास आश्चर्य वाटायला नको.

0 Comments: