Type Here to Get Search Results !

वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ, हार तुरे नको, जुन्या सायकल, मोबाईल, पुस्तके द्या; तांबे पिता पुत्रांचे आवाहन



पुणे, दि. २३ (चेकमेट टाईम्स): आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आलेल्या वाढदिवसानिमित्त शेकडो फ्लेक्स लावायचे, शक्तिप्रदर्शन करायचे असा फंडा अनेकजण राबवताना दिसतात. मात्र खऱ्या अर्थाने जनतेशी बांधिलकी असलेला व्यक्ती हा सगळा तामझाम करण्यापेक्षा लोकहित डोळ्यासमोर ठेऊन उपक्रम राबवतो. पण अशा लोकांची उणीव नक्कीच आहे. अशाच एका कर्वेनगर मधील व्यक्तिमत्वाचा उद्या शनिवार दि. २४ जुलै २०२१ रोजी वाढदिवस असून, त्यांनी प्रसिद्धीपेक्षा आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे.

 

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे पुणे शहर उपाध्यक्ष आनंद उर्फ बंडू तांबे आणि किंग ऑफ किंग्स दहीहंडी उत्सव समितीचे अध्यक्ष शुभम तांबे अशी त्या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या समाजसेवकांची नवे असून, त्यांनी कोरोनामुळे उद्भवलेल्या बिकट परिस्थितीवर मात करण्यासाठी “आम्ही यंदाचा वाढदिवस अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्याचे ठरवले आहे. त्याचप्रमाणे वाढदिवसाच्या निमित्ताने कोणतीही हार-फुले गुच्छ भेटवस्तू न आणता आपल्या जुन्या बंद पडलेल्या सायकल, जुने बंद पडलेले मोबाईल, वाचून झालेली जुनी पुस्तके भेट म्हणून द्यावी” असे आवाहन केले आहे.

 

आज मुलांना ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईलची गरज आहे. अनेकांच्या घरात वडिलांचा एकच फोन आहे. त्यांच्या घरात मुलांच्या शिक्षणाचा तरी खोळंबा होतो किंवा वडिलांच्या कामाचा. यामुळे दोघांपैकी एकाचे नुकसान ठरलेले आहे. त्याच्या या परिस्थितीवर उपाय म्हणून तांबे परिवार समर्थ सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून या जुन्या सायकल आणि जुने मोबाईल दुरुस्त करून ते गरजवंतांपर्यंत पोचवणार आहेत. त्यामुळे अनेकांच्या अंधाऱ्या भविष्याला प्रकाशाची वाट दिसणार आहे. त्याचबरोबर जुनी आणि वाचून झालेली पुस्तके घेऊन त्याचे एक मोफत वाचनालय सुरू करून, सर्वांसाठी मोफत वाचनालय सुरु करण्याचा मानस तांबे कुटुंबीयांनी केला आहे.

 

त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आनंद तांबे आणि शुभम तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण, कापूर आणि तुळशीच्या रोपांचे वाटप, रांगोळी स्पर्धा त्याचबरोबर विशेषतः रिक्षांकरिता प्रवासी आणि चालकांमध्ये सुरक्षा पडदा, टायर, फुट मॅट, मीटर कव्हर अशा साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे, शिवाय ज्या रिक्षांचे हूड फाटले आहे, त्या रिक्षांना पूर्ण हूड देखील मोफत वाटप केले जाणार आहेत. एकूणच हा वाढदिवस एक शक्तीप्रदर्शन न होता खऱ्या अर्थाने सामाजिक कार्य करून साजरा करण्याचा मानस आनंद उर्फ बंडू तांबे यांनी केला आहे. त्याला नागरिकांनी प्रतिसाद द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

 

माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युबवर फॉलो करा...!

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.