Type Here to Get Search Results !

संत तुकारामांचे नाव घेऊन राष्ट्रवादीच्या नगरसेविकेचे जय श्रीराम | NCP Pune



Beautification in Shriram Society, Warje by NCP Corporator Laxmi Dudhane


पुणेदि. (चेकमेट टाईम्स): "हेची थोर भक्ती आवडते देवासंकल्पावी माया संसाराचीठेविले अनंते तैसेची रहावेचित्ती असु द्यावे समाधान" ही जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगाचा दाखला देताना समाधान असल्यामुळे आपल्या या भागाचा विकास सुरू असल्याचे राष्ट्रवादीच्या नगरसेविका लक्ष्मी दुधाणे (Lakshmi Dudhane) यांनी जय श्रीराम म्हटले आहे.

वारजे कर्वेनगर प्रभाग क्र. ३१ (Warje Karvenagar Prabhag 31) येथील श्रीराम सोसायटीच्या (Shree Ram Society) मुख्य चौकात केलेल्या सुशोभीकरण (Beautification) वास्तूचे लोकार्पण ज्येष्ठ नागरिक शेखर फडके यांच्या हस्ते आणि पुणे महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ (Dipali Dhumal) यांच्या उपस्थितीत पार पडले, त्यावेळी त्या बोलत होत्या.

राष्ट्रवादीच्या कोथरुड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष स्वप्नील दुधाने (Swapnil Dudhane, president of NCP's Kothrud assembly constituency) यांनी यावेळी बोलताना म्हटले की, "कोणतेही विकास काम करत असताना तेथील नागरिकांचा सहभाग हा महत्वाचा असतो. गेल्या चार वर्षात मी बघितले की श्रीराम सोसायटी येथील कामांचा पाठपुरावा मोठ्या प्रमाणात असतोत्यामुळे आम्हालाही काम करायला आनंद असतो. तसेचपरिसरातील विकास कामे मार्गी लागण्याबाबत सोसायटी मधील अर्ध्याअधिक नागरिकांचे श्रेय असते."

याप्रसंगी श्रीराम सोसायटी’सह परिसरातील रहिवाश्यांनी लक्ष्मी दुधाणे यांच्या प्रयत्नातून करण्यात आलेल्या या सुशोभीकरण कामाचे कौतुक केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे कोथरुड विधानसभा युवक अध्यक्ष प्रमोद शिंदेकिशोर शेडगेमनीष धुमाळ यांच्यासह श्रीराम सोसायटीचे अध्यक्ष विठ्ठल पासलकर, पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर व्हाटस अॅप करा ! आम्हाला फेसबुकइंस्टाग्राम आणि युट्युबवर फॉलो करा...!

फेसबुक लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

युट्युब लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

इंस्टाग्राम लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. बातमीचे शिर्षक चुकीचे वाटते, यातून असे वाटते की, राष्ट्रवादीच्या नगरसेविकेने BJPमधे प्रवेश केलाय.
    म्हणजे मला तरी अगोदर असेच वाटले.
    पुर्ण बातमी वाचल्या नंतर काय ते कळले.

    उत्तर द्याहटवा