Type Here to Get Search Results !

खडकवासल्याचे आमदार भिमराव तापकीर विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला राहणार गैरहजर?

https://www.youtube.com/c/CheckmateTimes

 

Khadakwasla MLA Bhimrao Tapkir will be absent from the monsoon session of the Assembly?

 

पुणे, दि. 4 (चेकमेट टाईम्स): कोरोना आणि कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या छायेखाली... होणार, नाही होणार... म्हणता म्हणता अखेर पावसाळी अधिवेशन सोमवार दि.५ आणि मंगळवार दि.६ जुलै २०२१ घेण्याचे निश्चित करण्यात आले. मात्र या अधिवेशनाला पुण्यातील खडकवासला विधानसभा मतदार संघाचे आमदार भिमराव तापकीर गैरहजर राहणार असल्याचे समोर आले आहे.

मोठ्या प्रमाणात सामाजिक संपर्क असलेल्या भिमराव तापकीर यांना एवढ्या दिवसांमध्ये कोरोना’ने गाठले नव्हते. मात्र पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शासन नियमानुसार लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेले असले तरी कोरोना विषाणूचा संसर्ग होवू नये म्हणून विधानभवनात अधिवेशन कालावधीमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व मान्यवरांना, अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी यांच्याकरिता लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेले असले तरी अधिवेशन कालावधीत विधानभवन परिसर प्रवेशाकरिता सर्वांना RT-PCR कोरोना चाचणी सक्तीची करण्यात आली असल्याने, तापकीर यांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले असतानाही पुण्यातील नायडू रुग्णालयात आपली RT-PCR कोरोना चाचणी केली. मात्र दुर्दैवाने यात त्यांचा कोरोना अहवाल पॉजीटीव्ह आल्याचे निष्पन्न झाले आहे.

या पार्श्वभूमीवर आमदार भिमराव तापकीर यांनी गेल्या काही दिवसांमध्ये त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे. आपली प्रकृती उत्तम असून, खडकवासल्यातील नागरिकांच्या प्रेमाची उर्जा आपल्याला मिळत आहे. त्यामुळे आपण लवकरच नागरिकांच्या सेवेत रुजू होऊ, असा विश्वास आमदार तापकीर यांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर खडकवासला विधानसभा मतदार संघातील अनेक महत्वाच्या विषयावर या पावसाळी अधिवेशनात प्रकाश टाकून नागरी प्रश्न सोडवण्याचा आपला प्रयत्न होता. मात्र आपण खडकवासला विधानसभा क्षेत्राच्या प्रगतीसाठी बांधील असून, सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असेही तापकीर यांनी म्हटले आहे.

पावसाळी अधिवेशन काळात विधानसभा परिसरात गर्दी होवू नये यासाठी विधानमंडळाच्या सदस्यांचे स्वीय सहायक, वाहनचालक व सुरक्षा रक्षक यांची बसण्याची व्यवस्था बाहेरील तंबूमध्ये करण्यात येणार आहे. मंत्री व राज्यमंत्री यांच्यासोबत एकाच अधिकाऱ्याला प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच अधिवेशन कालावधीत खासगी व्यक्तींना विधानभवनात प्रवेश देण्यात येणार नाही. याचबरोबर मंत्रालय अधिकारी व कर्मचारी यांना देखील मर्यादित स्वरुपात प्रवेश देण्यात येणार असल्याचे प्रशासनाने कळवलेले आहे.

सामाजिक अंतर राखण्याच्या दृष्टीने सभागृहामध्ये सदस्यांकरिता एका आसनावर एक सदस्य अशा प्रकारे व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच प्रेक्षक गॅलरी, विद्यार्थी गॅलरीमध्ये देखील सदस्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच सदस्यांना एक किट देण्यात येणार असून त्यामध्ये एक फेस शिल्ड, मास्क, हॅडग्लोव्हज, हँड सॅनिटायझेशनची बॉटल देण्यात येणार आहेत.

एकूणच सर्वांशी मनमिळाऊ वागणाऱ्या जनतेतील आमदाराला कोरोनाची लागण झाल्याची वार्ता खडकवासला विधानसभा मतदार संघात वाऱ्याप्रमाणे पसरली असून, आमदार भिमराव तापकीर यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी याकरिता अनेकांनी देवाला साकडे घातले असल्याचे समजते आहे.

याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर व्हाटस अॅप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युबवर फॉलो करा...!

फेसबुक लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

युट्युब लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

इंस्टाग्राम लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.